मुंबई

लोकलचा भार कमी ठेवायचा असेल तर, दिवसाचे 24 तास कामाच्या भिन्न वेळा करण्याचा पालिकेचा विचार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः उपनगरी रेल्वेवरील भार कमी करायचा असेल तर कार्यालयांच्या वेळा भिन्न असण्याची गरज आहे तसेच त्यांच्या सुटीतही लवचिकता ठेवण्याची आवश्यकता आहे. आता किमान कोरोनाच्या आक्रमणामुळे मुंबई महापालिकेने याबाबत विचार सुरु केला आहे. 

अत्यावश्यक सेवेसाठी उपनगरी रेल्वेची वाहतूक सुरु झाली, पण त्यातील वाढती गर्दी चिंतेची बाब झाली आहे. कोरोना रोखण्यासाठी सुरक्षित अंतराची गरज असते. मात्र सकाळच्या गर्दीच्यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि संध्याकाळी मुंबईहून जाणाऱ्या उपनगरी रेल्वेत हे अशक्यच असते. आता पूर्ण कर्मचारी कार्यालयात नसतानाही हा प्रश्न गंभीर होत असल्याचे दिसत आहे. आता आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मुंबई महापालिका कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा विचार करीत आहे. 

मुंबई महापालिकेतील कर्मचारी कल्याण, विरार या उपनगरातून येत आहेत. त्यांना उपनगरी रेल्वेशिवाय पर्याय नाही. आता या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा एकावेळी करण्याऐवजी त्यात बदल केल्यास उपनगरी रेल्वेतील गर्दी नक्कीच कमी होऊ शकेल. सरकारी कार्यालयानी याची सुरुवात केल्यावर खाजगी कार्यालयाच्या वेळेतही बदल होऊ शकतील. मुंबई महापालिकेने या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. त्यांनी याबाबतचा विचार सुरु केला आहे आणि त्याची घोषणा लवकरच होईल, असे सांगितले जात आहे. 

अनेक कर्मचारी कल्याण तसेच विरारच्या पुढील ठिकाणहून येतात. मात्र कल्याण तसेच विरार पुढील उपनगरी रेल्वेची संख्या कमी आहे. त्यातही कल्याण तसेच विरारपुढील स्थानकातही मर्यादीत थांबे असल्याने गर्दी जास्त होते. त्यामुळे कार्यालयीन वेळात बदलांबरोबर रेल्वेच्या फेऱ्यातही वाढ करण्याची मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर तिसरी धावपट्टी, सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू

ही पण ओरिजिनल नाहीच ! या गाजलेल्या मालिकेचा रिमेक आहे स्टार प्रवाहची वचन दिले तू मला

SCROLL FOR NEXT