मुंबई

अचानक पसरलेल्या अफवेमुळे मोकळ्या भूखंडावर उभ्या राहिल्या झोपड्या; जागा रिकामी करताना पोलिसांची दमछाक

तुषार सोनवणे

मुंबई - जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड परिसरात विक्रोळीच्या दिशेने येणाऱ्या मार्गात शासनाचा मोकळा भूखंड आहे. या भूखंडाच्या मालकाचे निधन झाले असून, त्यांनी संबधित भूखंड गरिबांना राहण्यासाठी दान केल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे या जागेवर रातोरात झोपड्या उभ्या राहिल्या. घक्कादायक बाब म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.

जोगेश्वरी - विक्रोळी लिंक रोड परिसरातील शासनाच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडावर गरिब कुटूंबातील लोकांनी अचानक झोपड्या उभ्या केल्या.  या भूखंडाच्या मालकाचे निधन झाल्याने त्यांनी हा भूखंड गरिबांना दान दिल्याची अफवा पसरल्याने या गरिब कुटूंबांनी या जागेवर आपले बस्तान मांडले.  मुंबईत आपल्या हक्काच्या घराची स्वप्न पाहणाऱ्यांनी लाकडी बांबू, कापड घेऊन जागा अडवण्यास सुरूवात केली. मुंबई ठाणे नवी मुंबईतील रहिवाश्यांनीही येथे धाव घेतली होती. अचानक मोकळ्या भूखंडावर गर्दी पाहून स्थानिकांनी विचारणा केली. त्यानंतर पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनाचे या प्रकरणाकडे लक्ष गेले.

येथे जमलेल्या लोकांना  समज देऊन स्थानिक आमदार, आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने शनिवारी हा भूखंड काही प्रमाणात रिकामी  करण्यात आला. रविवारीही काही लोक येथिल जागा सोडायला तयार नसल्याने, त्यांना हटवताना पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान ही अफवा नक्की कोणी आणि कशामुळे पसरवली त्याचे गूढ कायम आहे.

 Crowds on Vikhroli plot due to rumors in mumbai

----------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Dispute : 'तृणमूल'च्या नाव-चिन्हाचा वाद; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, निवडणूक आयोगाला ४ महिन्यांची मुदत

Kolhapuri Jaggery Crisis : कोल्हापुरी गुळाचा ब्रँड धोक्यात? गुऱ्हाळघरे बंद पडण्याच्या मार्गावर; एका आदणावर शेतकऱ्याला होतोय तब्बल 2 हजार रुपयांचा तोटा

अंबरनाथ, बदलापूरवर पाणीकपातीचे संकट गडद; उल्हास नदी सर्वाधिक गढूळ, ३७० 'एनटीयू'वर प्रमाण

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीर विधानसभेत राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव बहुमताने मंजूर; भाजपचा सभात्याग

School Safety: सीसीटीव्हीविना विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; हिंगोली जिल्ह्यातील अनेक सरकारी, खासगी शाळा सुरक्षेच्या ‘नजरे’बाहेर, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT