Crude oil production in India declined mumbai Crude Oil Latest News
मुंबई

Crude oil : देशात कच्च्या तेलाचे उत्पादन घटले

सरकारी कंपनी ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने पश्चिम तेल उत्खनन क्षेत्रातून कच्च्या खनिज तेलाचे १.७ टक्के कमी उत्पादन घेतले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तेल क्षेत्रांतून उत्खनन कमी झाल्यामुळे जुलै महिन्यात देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन घटले आहे. सरकारी कंपनी ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनने पश्चिम तेल उत्खनन क्षेत्रातून कच्च्या खनिज तेलाचे १.७ टक्के कमी उत्पादन घेतले आहे; तर सोबत खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी उत्खनन कमी केल्यामुळे जुलैमध्ये भारताचे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन ३.८ टक्क्यांनी घटले आहे, अशी सरकारी आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली.

ओएनजीसी आणि खासगी तेल कंपन्यांकडून तेलाचे उत्खनन कमी झाल्याचा हा परिणाम मानला जात आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील उत्पादनाच्या तुलनेत यंदा हे उत्पादन ३.८ टक्के घटले आहे. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. कच्च्या खनिज तेलाचे उत्खनन करून त्यावर प्रक्रिया करून पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनाचे उत्पादन घेतले जाते, ते जुलैमध्ये २.४५ दशलक्ष टनांपर्यंत घटले आहे, जे मागील वर्षी २.५४ दशलक्ष टन होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गाला कवच; १३ ठिकाणी स्मार्ट कॅमेरे बसवणार, प्रत्येक वाहनावर करडी नजर राहणार

FIFA World Cup: स्पेनच्या ऐतिहासिक विजयाने टीम इंडियाच्या २०२७ चा वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशा वाढल्या; जाणून घ्या भन्नाट कनेक्शन

Live Updates Marathi : लोकआयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Rautwadi Waterfall Parking Facility : राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी अन् तासनतास वाहतूक कोंडी! 300-400 वाहनांच्या पार्किंगसाठी 'हा' पर्याय उपलब्ध?

Kolhapur Cricket Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा मार्ग मोकळा; पहिले डिजाईन आले समोर, राज्य शासन-क्रिकेट असोसिएशनमध्ये करार

SCROLL FOR NEXT