माथेरान : एमटीडीसी रिसॉर्टमध्ये चुलीवरील जेवणासाठी असलेली मातीची भांडी.
माथेरान : एमटीडीसी रिसॉर्टमध्ये चुलीवरील जेवणासाठी असलेली मातीची भांडी. 
मुंबई

माथेरानमध्‍ये मातीच्या भांड्यांत चुलीवरचे जेवण

सकाळ वृत्तसेवा

माथेरान : माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. येथील खोल्यांमध्ये स्वच्छता ठेऊन सर्व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पर्यटकांना सेल्फी स्पॉट, छोटा आडोटोरिम, पर्यटकांसाठी वेगवेगळे खेळ, निरव शांतता झोन तयार करण्यात आला आहे. रिसॉर्टमध्ये पर्यटकांसाठी पारंपरिक मातीच्या भांड्यांमध्ये चुलीवरचे जेवण दिले जाणार आहे.

माथेरानमधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टला हेरिटेज दर्जा आहे. खोल्यांमध्ये लाकडापासून बनविलेले फर्निचर, खोल्यांची आरास पर्यटकांना हमखास आवडते. त्यामुळे पर्यटक येथे आवर्जून राहतात. आता रिसॉर्टमध्ये पर्यटकांना आवडणाऱ्या खाद्यानाची व्यवस्था केली आहे.

पंजाबी, गुजराती, मोघलाई, राजस्थानी जेवणाबरोबरच आता परदेशी जेवणसुद्धा येथे मिळणार आहे. रिसॉर्टमध्ये विशेषत: इटालियन फूडला पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. आता महाराष्ट्रीयन पद्धतीचे मातीच्या भांड्यात चुलीवरचे जेवण देण्याचा उपक्रम सुरू केल्याने पर्यटन व्यवसायात वृद्धी होणार आहे.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी कारभार हाती घेतल्यापासून महाराष्ट्रातील रिसॉर्टमध्ये कमालीचे बदल झाले आहेत. माथेरानच्या रिसॉर्टमधील खोल्यांची स्वच्छता, पर्यटकांना सुविधा, त्यांच्या आवडीचे जेवण यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच स्थानिक पातळीवरील इत्यंभूत माहितीही दिली जाणार आहे 
- अमोल भारती, शाखा व्यवस्थापक, माथेरान. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT