मुंबई

दिलासा! मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर... गेल्या 24 तासात 1010 कोरोनाबाधितांची भर

मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत आज बाधित रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा हजारच्या वर गेला असून आज 1,010 रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 1,28,726 झाली आहे.मुंबईत आज 47 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,130 वर पोचला आहे. मुंबईत आज 719 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 80 टक्के इतका आहे.                                                

मुंबईत आज नोंद झालेल्या 47 मृत्यूंपैकी 35 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 32 पुरुष तर 15 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 47 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षा खालील होते. 33 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते तर 12 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 719 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 1,03,468 रुग्णांना घरी सोडण्यात आले.मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 85 दिवसांवर गेला आहे. तर 15 ऑगस्ट पर्यंत एकूण 6,51,593  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर  9 ऑगस्ट  ते 15 ऑगस्ट  दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 0.82 इतका आहे. 

मुंबईत 570 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,631 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 5,482 अति जोखमीचे रुग्ण आहेत तर 3,709 रुग्ण कोविड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

SCROLL FOR NEXT