cyber crime esakal
मुंबई

Cyber Crime : सायबर क्राईममध्ये भारतातील 'हे' शहर नंबर वन, मुंबईचंही प्रमाण चिंताजनक

सायबर गुन्हेगारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही वर्षांमध्ये देशातील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. नुकताच क्विक हिल या सेक्यूराईट लॅब्सचा एक अहवाल समोर आला आहे.

या अहवालामधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ज्यातून सायबर गुन्हेगारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.

या अहवालामधून असे निदर्शनास आले आहे की, मुंबई, पुणे, कोलकाता आणि दिल्ली या प्रमुख शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात व्यापक वाढ झाली आहे.

२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये निदर्शनास आलेल्या सायबर धोक्यांच्या आकडेवारीनुसार कोलकाता हे शहर ७.०८ दशलक्ष सायबर धोक्यांसह या यादीमध्ये अव्वलस्थानी होते. त्यानंतर ७.०० दशलक्ष सायबर धोक्यांसह मुंबईचा दुसरा क्रमांक या यादीमध्ये होता.

या यादीमध्ये समावेश असलेली इतर शहरे खालीलप्रमाणे

  • बेंगळुरू (४.८६ दशलक्ष सायबर धोके)

  • सुरत (४.१६ दशलक्ष सायबर धोके)

  • हैदराबाद (३.५० दशलक्ष सायबर धोके)

  • अहमदाबाद (३.४५ दशलक्ष सायबर धोके)

  • चेन्‍नई (२.३६ दशलक्ष सायबर धोके)

  • गुरगाव (२.०१ दशलक्ष सायबर धोके)

सायबर गुन्हेगारांनी विविध अ‍ॅप्‍लीकेशन्‍सवर आणि व्यासपीठांवर वापरलेल्‍या नाविन्‍यपूर्ण टेक्निक्‍समध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. २०२३ च्‍या दुसऱ्या ति‍माहीत सेक्‍यूराईट लॅब्‍सच्या संशोधकांना ही बाब प्रामुख्याने आढळून आली आहे. ही बाब अतिशय चिंतेची आहे.

तसेच, या अहवालामधून निदर्शनास आले की, देशभरातील सेक्‍यूराइट लॅब्‍स तज्ञांनी १०२.८ दशलक्षहून अधिक सायबरधोके शोधले आहेत.

या संशोधकांना निदर्शनास आलेले गुन्हेगारांचे सर्वात मोठे ट्रेण्ड्स म्हणजे हिडन अ‍ॅड्स होयं. या अ‍ॅड्सचा प्रसार गुगल प्‍लेवरील अँड्रॉईड गेमिंग अ‍ॅप्‍सच्‍या माध्‍यमातून होत आहे. याचा शिताफीने वापर करून सायबर गुन्हेगार नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे काम करत आहे.

त्यामुळे, आपण सर्वांनीच या सायबर धोक्यांपासून लांब राहणे आवश्यक आहे. आपल्याला कायदेशीर वाटणाऱ्या या बनावट अ‍ॅप्सपासून सावध राहणे गरजेचे आहे.

ही फसवी अ‍ॅप्लिकेशन्स फेसबूक आणि जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे तसेच, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्सफर करणे अशा प्रकारची संवेदनशील माहिती सहज चोरू शकतात. त्यामुळे, सर्वांनीच सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे क्विक हिलने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT