Fraud Case 
मुंबई

Fraud Case : इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून ६० लाख उकळले

गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून निवृत्त प्राध्यापकाची फसणवूक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : इन्स्टाग्रामवर अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे एका सेवानिवृत्त प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. अमेरिकेतील कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास खूप मोठा आर्थिक फायदा होईल, असे प्रलोभन दाखवून त्या महिलेने त्यांच्याकडून तब्बल ६० लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

५६ वर्षीय सेवानिवृत्त प्राध्यापक उलवेमध्ये राहण्यास असून ऑगस्टमध्ये एका महिलेने इंग्लंडमधील ॲवा जुडिला असल्याचे भासवून त्यांच्यासोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली होती. त्यानंतर महिलेने चॅटिंग करत अमेरिकेतील यूएसए एअरब्रेक्स इन्व्हेस्टमेंट कंपनीची माहिती देत २० हजार डॉलर गुंतवल्यास एका महिन्याला १ कोटी ४० लाख रुपये मिळतात, असे प्रलोभन दाखविले. त्यानुसार महिलेने दिलेल्या बँक खात्यात त्यांनी १६ लाख रुपये पाठवून दिल्यानंतर दोघे मिळून गुंतवणूक करण्याचा बहाणा करून आणखी ३० हजार डॉलर गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

या गुंतवणुकीमध्ये दर दिवसाला १० टक्के परतावा मिळेल, असे तिने सांगितल्यानंतर प्राध्यापकांनी सदर रक्कम भरली. त्यानंतर तिने एअरब्रेक्स साईटवर प्राध्यापकाच्या खात्यात १ लाख ७५ हजार डॉलर (१ कोटी ४० लाख रुपये) जमा झाल्याचे दाखविले. मात्र ११,७५० डॉलर दंड भरल्यानंतर ती रक्कम काढून घेता येईल, असे सांगितले. त्यामुळे प्राध्यापकाने दंड स्वरूपात काही लाखांची रक्कम तिने दिलेल्या बँक खात्यात पाठवून दिली. मात्र तिने काही रक्कम परत न केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

ऑनलाईन प्रलोभन टाळण्याचे आवाहन

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईनच्या माध्यमातून बक्षीसाचे प्रलोभन दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रकारचे कर अथवा दंड आकारण्याच्या बहाण्याने भामट्यांकडून पैसे मागण्यात येतात. अशा प्रकारे सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तरी या प्रकरणी नागरिकांनी योग्य प्रकारे काळजी घेत अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT