मुंबई

मित्रांनो व्हिडिओकॉल जरा जपून करा! अश्लील व्हिडिओ कॉलची रेकॉर्डिंग करून भामट्यांची सायबर खंडणी

अनिश पाटील


मुंबई - समाज माध्यमांवर झालेल्या मैत्रीनंतर अश्लील व्हिडिओ कॉल करून ते पाहत असतानाचे चित्रीकरण वायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचा गंभीर प्रकार गिरगाव परिसरात घडला आहे याप्रकरणी डीबी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणातील 50 वरषीय तक्रारदार हे वित्तीय सल्लागार म्हणून काम करतात. समाज माध्यमांवर त्यांची ओळख अंकित शर्मा नावाच्या व्यक्ती सोबत झाली होती. त्याने तक्रारदाराला 19 डिसेंबरला व्हिडिओ कॉल केला होता. तो उचलल्यानंतर त्यावर अश्लील रेकॉर्डींग सुरू झाले. ते पाहत असताना तक्रारादाराचे आरोपी शर्माने चित्रीकरण केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने तात्काळ कॉल बंद केला. पण त्यानंतर आरोपीने या चित्रीकरणाच्या सहाय्याने त्यांना धमकवण्यास सुरूवात केली. अश्लील व्हिडिओ कॉल सुरू असताना तुमचे चित्रीकरण करण्यात आले असून ते सर्वत्र वायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने तक्रारदाराकडे खंडणीची मागणी केली. सुरूवातीला तक्रारदाराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, मात्र वारंवार येणा-या धमक्यांना कंटाळून अखेर त्यांनी याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 384, 385 सह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम 66(क), 67, 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपींना पकडण्यात येईल, असे अधिका-याने सांगितले.

Cyber ransom for crooks by recording pornographic/abuse video calls crime in girgaon mumbai

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT