Cyclone Gulab sakal
मुंबई

Gulab Cyclone : शेतकऱ्यांसाठी 'गुलाब' चक्रीवादळ ठरणार वरदान

आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे मत, शेतकऱ्यांसाठी 'गुलाब' वरदान ठरणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असली तरी या वादळाचा कुठलाही धोका महाराष्ट्राला धोला नाही उलट ते वरदानच ठरेल असे भाकीत आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ व चक्रीवादळां तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.

चक्रीवादळ तयार होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस 200 ते 250 तास म्हणजे एक आठवड्यातून जास्त कालावधी लागतो त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते पश्चिम बंगाल जवळ धडकेल. ते तिव्रतेने कमी शक्तीशाली असल्याने फारसे नुकसान यामुळे होणार नाही, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही अशी माहिती ही जोहरे यांनी दिली आहे.

चक्रीवादळाला होणारा बाष्प पुरवठा हीच चक्रीवादळांची शक्ती असते. जमिनीवर धडकलयावर साधारणतः एक तासात ते नष्ट होते व बाष्प विखुरते.त्यामुळे 'गुलाब' चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून 1 हजार 900 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करत महाराष्ट्राला विदर्भातून मुंबईच्या दिशेने जाऊन अरबी समुद्रात जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन ही जोहरे यांनी केले आहे.

सुवर्णसंधी: तयार पिके काढून घ्या

काढणीस आलेली तयार पिके काढून घेण्यासाठी गुलाब चक्रीवादळाने बाष्प ओढून घेत महाराष्ट्रातील शेतकर्यांना पावसाची उघडीप होत सूर्यदर्शनासह चांगली संधी दिली आहे. त्यामुळे सध्या तरी मुसळधार पाऊस वाढणार नाही. काढलेले अन्नधान्य हे सुरक्षित उंच ठिकाणी व कोरड्या जागी साठवावे असे आवाहन देखील प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT