corona  sakal media
मुंबई

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ''सायटोकाईन स्टॉर्म'

मुंबईत मृतांचा आकडा वाढतोय

मिलींद तांबे

मुंबई : मुंबईत एकेरी आकड्यावर आलेला मृतांचा (Corona Deaths) आकडा आता पुन्हा दोन अंकी झाला आहे. गंभीर कोविडसह बरे झालेल्या रुग्णांमधील 'सायटोकाईन स्टॉर्म' (Cytokine Storm)च्या वाढलेल्या समस्या हे याचं एक प्रमुख कारण असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे (Doctors) म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave) याचे स्वरूप बदलले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकं पुन्हा एकदा रुग्णालयांत दाखल होत आहेत. जे रुग्ण कोविड वॉर्डमध्ये होते त्यांना आयसीयूमध्ये (ICU) दाखल करावे लागत आहे. कोविड नियंत्रणात आल्यानंतर काही कालावधीने ही लक्षणे दिसत असल्याने निदान तीन महिने स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेऊन काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Cytokine storm in Corona free patients deaths increases )

काही दिवसांआधी काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह झाले होते. ते त्यातून बरे झाले , मात्र 'सायटोकाईन स्टॉर्म' मुळे त्यांना आयसीयू मध्ये दाखल करावे लागले. त्यांची तपासणी केली असता त्यांना न्यूमोनिया तसेच काळ्या बुरशिचा संसर्ग देखील झाला असल्याचे निदान झाले असे लायन्स क्लब रुग्णालयातील डॉक्टर सुहास देसाई यांनी सांगितले. आपली रोग प्रतिकार शक्ती गरजेपेक्षा जास्त सक्रीय होत रोगांशी लढण्याऐवजी स्वतःच्याच शरीराचं नुकसान जेव्हा करू लागते, तेव्हा त्याला 'सायटोकाईन स्टॉर्म'ची समस्या उद्भवल्याचे दिसते असे ही ते म्हणाले.

कोविडच्या पहिल्या लाटेत रुग्ण 'सायटोकोईन स्टॉर्म'च्या लक्षणांसह रुग्णालयात दाखल व्हायचा. ते रुग्ण गंभीर असत , मात्र तो बरा झाल्यानंतर त्यांना पुन्हा कोविड होण्याची शक्यता नसायची. आता मात्र रुग्ण बारा होत असतांना तो अचानक 'ब्रेथ लेस' होतो किंवा त्याची प्रकृती नाजूक बनते. अशा अनेक रुग्णांमध्ये न्यूमोनिया किंवा म्युकर मायकोसिस झाल्याचे ही निष्पन्न झाले आहे असे लायन्स क्लब रुग्णालयातील डॉक्टर सुहास देसाई यांनी सांगितले.

कोविड मधून बरे होऊन आयसीयू वॉर्डमधून सर्वसाधारण वॉर्ड मध्ये गेलेल्या रुग्णांपैकी 5 % रुग्ण पुन्हा काही दिवसांनी आयसीयू मध्ये दाखल झाले. यातील 2 % रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. अनेक रुग्ण आयसीयू मधून बरे होऊन सर्वसाधारण वॉर्ड मध्ये येतात. मात्र यातील 3 ते 5 % रुग्णांमध्ये पुन्हा कोविडची लक्षणे दिसतात असे ओकहार्ड रुग्णालयातील डॉ बिपीन जिभकाटे यांनी सांगितले. रुग्णांना पुन्हा आयसीयूमध्ये दाखल करावे लागते. त्यातील 1 ते 2 % रुग्णांचा मृत्यू देखील होत असल्याचे ते पुढे म्हणाले. 40 % रुग्ण असे आहेत ज्यांना मोठ्या कालावधीसाठी व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. काही रुग्णांना तर महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते असे ही डॉ. जीभकाटे पुढे म्हणाले.

मुंबईतील मृतांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. 8 जून ला मुंबईत केवळ 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र 9 जून ला 27 मृत्यूंची नोंद झाली. तेव्हापासून मृत्यूचा आकडा सतत वाढत आहे. 2 जुलैला देखील 27 रुग्ण दगावले. गेल्या आठवडाभर मुंबईतील मृतांचा दैनंदिन आकडा हा 25 ते 30 च्या आसपास आहे. गेल्या आठवड्याभरात मुंबईत 151 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात 40 वयोगटाखालील 22 , 40 ते 60 वयोगटातील 57 तर 60 पेक्षा अधिक वयोगटातील 72 पेक्षा अधिक रुग्ण दगावले आहेत. 60 वयोगटाच्या आतील रुग्णांचा विचार केला तर एकूण 79 रुग्ण दगावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT