fish market sakal media
मुंबई

मासळी बाजारावर महापालिकेचा हातोडा ; नोटीस न देता कारवाई झाल्याचा आरोप

- समीर सुर्वे

मुंबई : दादर सेनापती बापट मार्गावरील (dadar) मासळी बाजारावर (fish market) महानगरपालिकेने (bmc action) बुलडोझर फिरवला आहे. येथील 400 ते 500 विक्रेत्याना (fish traders) एरोली आणि मरोळ (airoli and marol) येथे स्थालांतरीत (shifting) करण्यात येणार आहे. मात्र, पालिकेने ही कारवाई नोटीस न देता केली असल्याचा आरोप मासळी विक्रेत्यांनी केला.

दादर पश्‍चिम येथील सेनापती बापट मार्गावर(तुळशी पाईप रोड)वरील मासळी बाजार स्थालांतरीत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यासाठी येथील विक्रेत्यांना मरोळ आणि ऐरोलीत स्थालांतरीत करण्यात येणार आहे.ही कारवाई थांबविण्यासाठी मासेविक्रेत्या महिलांनी सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.मात्र,ही बैठक सुरु असतानाच पालिकेने ही मंडई पाडण्यास सुरवात केली.अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.मात्र,पालिकेच्या जी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी नियमानुसार नोटीस देण्यात आली असल्याचे सांगितले.

टॉवरसाठी बाजार हटवला

या मंडईतून मुंबई,ठाण्यासह राज्याबाहेरील ठिकठिकाणच्या बाजारांमध्ये व हॉटेल्स मध्ये मासळी पुरवली जाते.दादर परीसरातील नागरीकांसाठी ही जवळची मंडई आहे.मात्र,या परीसरात नव्याने उभ्या राहात असलेल्या टॉवर मधील श्रीमंतांना माशांचा वास आवडत नसल्याने ही मंडई हटविण्यात आली असा आरोप समित्याच्या महिला अध्यक्षा नैना पाटील यांनी केला आहे.

ऐरोलीतील विक्रेत्यांचा विरोध

फोर्ट पलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची धोकादायक इमारतील मासळी बाजारातील विक्रेत्यांनाही ऐरोली जकात नाक्यावर स्थालांतरीत करण्यात आले आहे.दादर मंडईतील विक्रेते या ठिकाणी पोहचले तेव्हा वाद निर्माण झाला.दोन्ही गटात निदर्शने झाली असून अगोदर व्यवसाय करत असलेल्या विक्रेत्यांनी नव्या विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास विरोध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Politics: ट्रम्पमुळे कोपरगाव रस्ता रखडला: सुजय विखे पाटील; अजब दाव्याने राजकीय चर्चा

IND vs SL 1st Test: रिषभ पंतला संघातून हाकलण्याची वेळ आलीय! फॅन्सची मागणी; माजी क्रिकेटपटूने त्याचा 'common sense' काढला...

Mumbai Goa Highway Toll : ओसरगाव टोलनाका आजपासून सुरू; मासिक 350 रुपयांचा पास की 50 टक्के सूट? जाणून घ्या वाहननिहाय टोलचे संपूर्ण दर

Marathi News Live Updates : कांदिवलीत चार मजली व्यावसायिक इमारतीला आग; ११ जणांची सुखरूप सुटका

West Bengal Hotel Fire : साखरझोपेत असतानाच मृत्यूने गाठले ! पहाटे हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT