hanuman temple sakal media
मुंबई

दादरचे ७० वर्षांपासूनचे जुने हनुमान मंदिर हटवण्यासाठी मध्य रेल्वेची नोटीस

रेल्वे प्रशासन भावना शून्य होऊन नोटीस बजावत असल्याच्या प्रतिक्रिया

कुलदीप घायवट

मुंबई : दादर रेल्वे स्थानकाच्या (dadar railway station) पूर्वेकडे 70 वर्षे जुने हनुमान मंदिराला (hanuman temple) हटविण्याची नोटीस (notice) मध्य रेल्वेने (central railway) हनुमान मंदिर प्रशासनाला दिली आहे. दादर स्थानकावर विकासात्मक कामे (development) करण्यासाठी बेकायदेशीर असलेले मंदिर तत्काळ हटवण्याची आवश्यकता आहे. 7 दिवसांच्या आत हे मंदिर हटविण्यात यावे, अशी नोटिस मध्य रेल्वेने मंदिर प्रशासनाला दिली आहे. रेल्वे प्रशासन भावना शून्य होऊन (feeling less railway authorities) नोटीस बजावत असल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे.

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांपैकी दादर स्थानक एक आहे. मध्य आणि पश्चिम मार्ग दादर स्थानकाला जोडले गेले आहे. तसेच, अनेक मेल, एक्स्प्रेसला दादर येथे थांबा दिला जातो. मुंबई-पुणे जाणाऱ्या खासगी बस आणि राज्य परिवहनच्या गाड्यांचा अधिकृत थांबा स्थानकापासून जवळ आहे. अनेक सरकारी कार्यालये, खासगी कार्यालय, शाळा, काॅलेज, मैदाने या भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार भारतीय रेल्वे स्टेशन विकास निगम (आयआरएडीसी) यांच्याद्वारे स्थानकाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. मात्र, स्थानकात बदल करण्यासाठी स्थानकाच्या पूर्वेकडील पादचारी पुलाशेजारी असलेल्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे.

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर हनुमान मंदिर हे रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीर बांधण्यात आले आहे असल्याचे दिसून आले आहे. या मंदिरामुळे प्रवाशांच्या वर्दळीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच रेल्वे स्थानकाशेजारी विकासकामे करण्यासाठी मंदिरामुळे अडथळे येत आहे. रेल्वेने याआधीही हे मंदिर बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. आता ही नोटीस मिळाल्यानंतर पुढील 7 दिवसांत या मंदिराची जागा रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी. अन्यथा, रेल्वे प्रशासन बळाचा वापर करून मंदिर हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, रेल्वेच्या या नोटीसवरून वाद पेटणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.

हनुमान मंदिराशी भक्तांच्या भावना जोडल्या आहेत. 70 वर्षांपासून हे मंदिर उभे आहे. मात्र, विकासाच्या नावावर मंदिर तोडणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडतो. रेल्वे प्रशासन याठिकाणी आलिशान माॅल्स, दुकाने उभे करणार आहे. त्यामुळे या सुविधेचा फायदा स्थानिकांसाठी किंवा प्रवाशांसाठी होणार नसून तो मोठमोठे उद्योजक, रेल्वे प्रशासनाला होणार आहे. या मंदिरात फक्त स्थानिक रहिवासी येत नसून टाटा, केईएम, वाडिया, अल्पोला या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक, शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी परिक्षेच्या वेळी दर्शन घेण्यासाठी येतात. त्यामुळे प्रत्येकाच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, रेल्वे प्रशासन भावना शून्य होऊन नोटीस बजावत आहे.

- प्रकाश कारखानीस, विश्वस्त, हनुमान मंदिर, दादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT