Accident News esakal
मुंबई

Mumbai Crime : दादरमधील 'त्या' अपघात प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दादर पश्चिम येथे एका भरधाव मोटरीने झाडाला धडक दिली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.या प्रकरणी चालक सुदर्शन झिंजुरटे विरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

या दुर्घटनेत सुनील दत्तवानी आणि सतीश यादव यांचा मृत्यू झाला. तर केविन पिल्लई आणि साद इक्बाल अन्सारी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चालकसुद्धा जखमी झालं असून त्याच्यावर केइएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आरोपी चालक मद्याच्या अमलाखाली होता का, याबाबत वैद्यकीय अहवालानंतर स्पष्टता येणार आहे.

दुर्घटनेतनंतर जखमी झालेले साद अन्सारी हे हिंदूजा रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर पिल्लई गंभीर जखमी असून त्याच्यावर वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचा पाचवा मित्र आणि मोटार चालक सुदर्शन झिंजुरटे जखमी असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही मित्र लोअर परळ येथील एका पबमध्ये गेले होते. तेथे मित्रांसोबत वेळ घालवल्यानंतर रात्री झिंजुरटे त्यांच्या मोटारीतून मित्रांसोबत घरी निघाले होते. रात्री 2 वाजयच्या सुमारास चालकाचा गाडीवर ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचे तपासात समोर आले आहे. चालक मद्य प्राशन करून गाडी चालवत असल्याचा संशय असून वैद्यकीय चाचणीनंतर ते स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT