Dadar Railway Station Sakal
मुंबई

Dadar Railway Platform : प्रवाशांना गोधळातुन मिळाली सुटका! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म सलग

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक शनिवारपासून (ता.०९ ) सलग करण्यात आलेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक शनिवारपासून (ता.०९ ) सलग करण्यात आलेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक १ ते ८ इतिहास जमा झाले असून प्रवाशांना गोधळ थांबला आहे. या नव्या बदलामुळे दादर रेल्वे स्थानकांतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गोधळातुन सुटका मिळाली आहेत.

दादर म्हणजे मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वांत गर्दीचे रेल्वे स्थानक; मात्र,पश्चिम आणि मध्य रेल्वेचे फलाट गाठताना प्रवाशांमध्ये कायम गोंधळ उडतो. दोन्हीकडील फलाट क्रमांक एकने सुरू होत असल्याने प्रवाशांचा उडणारा गोंधळ लक्षात घेऊन दादर स्थानकात सलग १ ते १४ फलाट क्रमांक शनिवारपासून देण्यात आलेला आहे.

नव्या बदलानुसार, दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून सुरू झालेला क्रम मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत कायम ठेवण्यात आलेला आहे. मध्य रेल्वेचे एक ते आठ क्रमांकाचे फलाट इतिहासजमा झाला असून त्याऐवजी ते आठ ते १४ क्रमाकांनी फलाट देण्यात आलेला आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी प्रवाशांना उद्घोषणामार्फत याची माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील धिम्या मार्गावरील पहिल्या प्लॅटफॉर्मला आता आठावा क्रमांक झाला आहे. त्यानंतर टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ असा झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांकासह केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही त्यानुसार बदल करण्यात आला आहे. पादचारी पूल आणि दिशादर्शक फलकांवरील क्रमांकही नव्याने देण्यात आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून दादर स्थानकांवरुन मी प्रवास करतोय, नेहमी प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांकावरून गोधळात पडायचे. मात्र उशिरा का होईना रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकांचे प्लॅटफॉर्म सलग केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना गोधळ होणार नाही.

- राकेश सावंत, नोकरदार

दादर स्थानकांवर गावरून नातेवाईक येत असताना त्यांना मध्य आणि पश्चिम रेल्वेचे प्लॅटफॉर्म सांगत असताना त्यांच्या गोधळ व्हायचा. मात्र, आता फक्त प्लँटफॉर्म क्रमांकामाचा गोधळ थांबणार आहे. याकरिता रेल्वे आम्ही आभार मानतोय.

- भीमा कोरम, प्रवासी

दादर हे स्थानक खूप मोठे आहे. त्यानुसार, रेल्वेने केलेला हा बदल खरच नवीन प्रवाशांना दिलासा देणारा आहे. रेल्वेला माझी एक आणखी विनंती आहे. की, त्यांनी दादर स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी काही उपाय कराव्यात.

- रुचिता मेश्राम, माहीला प्रवासी

पश्चिम रेल्वे : १ ते ७ प्लॅटफॉर्म

मध्य रेल्वे : ८ ते १४ प्लॅटफॉर्म

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT