dadar railway station platform no 1 changes on 9 december central railway marathi news Sakal
मुंबई

Mumbai News : ९ डिसेंबरला दादर रेल्वे स्थानकात होणार मोठे फेर बदल; प्रवाशांना मिळणार दिलासा!

प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर होणारी गर्दी लक्षता घेऊन मध्य रेल्वेने प्लँटफॉर्मच्या विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीपासून आणि प्लँटफॉर्मच्या गोधळापासून मोठा दिलासा मिळणार आहे.

दादर म्हणजे मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वात गर्दीचे रेल्वेस्थानक. मात्र, तिथे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे फलाट गाठताना प्रवाशांमध्ये कायम गोंधळ उडतो. कारण दोन्हीकडील फलाट क्रमांक एक ने सुरू होतात. प्रवाशांचा हा गोंधळ लक्षात घेऊन दादर स्थानकात आता सलग १ ते १५ फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे.

दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून सुरू झालेला क्रमम मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत कायम राहणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेचे एक ते आठ क्रमांकाचे फलाट इतिहासजमा होतील. त्याऐवजी ते आता आठ ते१४ क्रमाकांनी ओळखले जातील. ९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

प्लँटफॉर्मचे विस्तार अंतिम टप्प्यात

मध्य रेल्वेच्या दादर स्थनाकात फलाट क्रमांक एक आणि दोन एकमेकांना लागून होते. सीएसएमटी, परळहून सुटणार्‍या लोकल दादर स्थानकात फलाट क्रमांक एकवरून जातात, तर दोनवरून ११ गाड्या सुटत होत्या. त्यामुळे सात मीटर रूंदी असलेल्या या फलाटावर नेहमी प्रवाशांची गर्दीच असायची.

त्यामुळे वारंवार गाडीतून प्रवासी पडून अपघात होत आहेत. त्याची दखल घेत रेल्वेने सदर फलाटाच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले होते. हे काम अंतिम टप्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक २ रद्द राहणार आहे. सुधारित क्रमानूसार फलाट क्रमांक १ हा फलाट क्रमांक आठ देण्यात येणार आहे.

मरे, 'परे'ची तयारी पूर्ण

रेल्वे प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात सलग फलाट क्रमांक केले जात असून ९ डिसेंबर अंमलबजावणी होणार आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वेने तयारी सुरु केली आहे. साईन बोर्ड , घोषणांची पूर्वतयारी करण्यात आली आहे. तसेच लोकल ट्रेनमध्ये यांसदर्भात सूचना फलक बदलणे आदी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT