किशोरी पेडणेकर  File photo
मुंबई

दादर भाजी मार्केटमध्ये रोज होणाऱ्या गर्दीवर महापौरांचं उत्तर

रोज सकाळी वृत्तवाहिन्यांवर गर्दीचे चित्र दाखवले जाते

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत ज्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे, तिथून रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सगळ्यांची पुन्हा बैठक घेतली व ऑक्सिजनचा तुटवडा कसा भरुन काढता येईल, याविषयी चर्चा आणि विचारविनिमय केल्याचे महापौरांनी सांगितले. किरीट सोमय्यांनी आरोप केलाय की, खासगी रुग्णालयात कोविड पेशंटना जबरदस्तीने डिस्चार्ज घ्यायला सांगितलं जातय, त्यावर महापौरांनी "आम्ही पेशंटना वाऱ्यावर सोडत नाहीय. शक्य असेल तिथे जम्बो कोविड सेंटरमध्ये पाठवतोय" असे सांगितले.

दादर भाजीपाला मार्केट मध्ये नागरिकांची सतत गर्दी पाहायला मिळते. कोरोनाचा पहिल्या टप्यात दादर मार्केटचे तीन जागी विभाजन करण्यात आले होते. गर्दी वाढतेय मग या मार्केटचे विभाजन का केले जात नाही? या प्रश्नावर महापौरांनी, "बाजारपेठांची विभागणी केली पाहिजे असं मला वाटतं, पण ते का होत नाहीय हे मला कळत नाहीय" असे उत्तर दिले.

गुजरात मधून रेमडेसिव्हीर आणण्यावरून मोठे राजकारण रंगतांना पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी खोचक टीका केली आहे. "लोकशाहीच्या आणि प्रशासनाच्या पद्धतीने लस यायला हवी. कोणीही कुठून ही लस आणेल हे कसे चालेल. लोकांचा जीव वाचायचा असेल तर भाजपाने सोबत यावे" असे महापौर म्हणल्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT