Dahanu Rain  sakal
मुंबई

Dahanu Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!

सकाळ डिजिटल टीम

Dahanu Rain: डहाणू तालुक्यात दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागला. काही दिवसापूर्वीच परिसरात रब्बी हंगामाला सुरुवात झाली होती. मात्र पावसाने रोपांना मोठा फटका बसला. त्याचबरोबर गवत, पाओलीचा व्यवसाय, त्याचबरोबर वीटभट्टीची तयारी करत असलेले व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

डहाणू, कासा परिसरात गवत, पाओली खरेदीला आताच सुरुवात झाली होती. वीटभट्टीच्या कामाला काहींनी सुरुवात केली होती. पण या अवकाळी पावसाने खोडा घातला. गवत, पाओली व्यापाऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्याचबरोबर अनेक शेतकरी अजूनही भात झोडणीची कामे करत असल्याने त्यांचेदेखील मोठा फटका बसला आहे. पावसाने गवत, पाओलीचा भाव कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना हे नुकसान सहन करावे लागणार आहे.



भाजीपाल्याचे नुकसान
डहाणू परिसरातील अनेक शेतकरी पालेभाज्यांवर उदरनिर्वाह करतात. रब्बी हंगामाची पालेभाजी लागवड नुकतीच केली होती. वाल, हरभरा, तूर रोपांना पावसाचा फटका बसला आहे. आताच बऱ्याचशा प्रमाणात मुळा, शेपू, पालक, मेथी, माठ भाजी तयार झाली होती. पण या पावसामुळे शेतात पाणी साचून भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच शेतामध्ये रब्बी पीक पेरणी केली होती. रोपसुद्धा चांगली आली होती; पण अवकाळीमुळे अनेक रोपे खराब झाली. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
- सदानंद पाटील, शेतकरी

काही दिवसांपूर्वीच गवत, पाओलीची खरेदी सुरू होती. अजून गठड्या बांधण्याचे काम सुरू केले नव्हते; पण अचानक आलेल्या पावसाने गवत भिजल्याने आर्थिक फटका बसणार आहे.
- राकेश शिंदे, व्यापारी

आताच वीट व्यवसाय सुरू करण्याची तयारी केली होती. त्यासाठी आवश्‍यक साहित्यदेखील आणले होते. कामगारदेखील कामाला सुरुवात करणार होते, पण पावसामुळे वीट तयार करण्याचे काम लांबणार आहे. मागील वर्षीदेखील अवकाळीने मोठे नुकसान झाले होते.
- संतोष देशमुख, वीट व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT