Dahi Handi 2023 Sakal
मुंबई

Dahi Handi 2023: अंध मुलींनी लुटला दहीहंडीचा आनंद

जवळपास २० ते ३० दृष्टिहीन मुलींनी आपल्या पायातली ताकद दाखवून दोन थर लावून दहीहंडी फोडली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दहीहंडी फोडण्यासाठी सर्वच गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. यात दृष्टिहीन मुलीही मागे नाहीत. दादर पूर्व येथील श्रीमती कमला मेहता या अंध मुलींच्या शाळेतील मुलींनी दहीहंडी फोडत गोपाळकाला साजरा केला. आधारिका फाऊंडेशन, नन्ही फाऊंडेशन आणि जीवन प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्याने मुलींनी हंडी फोडली आणि जल्लोष साजरा केला.

जवळपास २० ते ३० दृष्टिहीन मुलींनी आपल्या पायातली ताकद दाखवून दोन थर लावून दहीहंडी फोडली. यावेळेस माटुंगा एसएनडीटीच्या निर्भया पथकाने विशेष उपस्थिती दाखवली. पथकाने अंध मुलींसह गाण्याच्या तालावर ठेका धरला. मुख्याध्यापिका विद्या जाधव यांच्या सहकार्याने शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिका विद्या कांबळे यांनी दृष्टिहीन मुलींचा दहीहंडीचा सराव करून घेतला.

दहीहंडीचा उत्सव आम्ही २००२ पासून शाळेत साजरा करत आहोत. फक्त कोविडकाळात आम्ही दहीहंडी फोडली नाही. आधारिका फाऊंडेशन, जीवनप्रबोधिनी आणि नन्ही परी व स्री-उद्योग वर्धिनी या संस्थानी पुढाकार घेतला आणि आमच्या मुलींना बळ दिले.

- विद्या जाधव, मुख्याध्यापिका, श्रीमती कमला मेहता विद्यालय

असा होतो सराव

दरवर्षी ‘आधारिका फाऊंडेशन’तर्फे या शाळेत दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. सातवी, सहावी, पाचवी आणि पहिलीच्या मुली यात सहभागी होतात. ब्रेलची मुलगी दृष्टी बागडे ही यंदा गोविंदा बनली होती. तिने दहीहंडी फोडली.

१५ दिवसांपासून सरावाला सुरुवात होते. खाली कोणी उभे राहायचे, कसे धरायचे, वर कोण चढणार या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. साखळीला धरून वर कसे चढायचे याचाही सराव करून घेतला जातो, असे शिक्षिका विद्या कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT