Dahihandi festival celebrated with social message at dombivali
Dahihandi festival celebrated with social message at dombivali 
मुंबई

सामाजिक संदेश व राजकीय चढाओढीने रंगला दहीहंडी उत्सव

संजीत वायंगणकर

डोंबिवली - बाजीप्रभू चौक येथे राज्यमंत्र्यांची बचतीचा संदेश देणारी ‘डोंबिवलीचा मानबिंदू’, शिवमंदिर चौकात प्रदूषण मुक्तीचा संदेश देणारी शहर प्रमुख राजेश मोरे यांची, चार रस्ता येथे बच्चे कंपनीच्या आवडीची 'कृष्ण बनून या, बक्षिस घेऊन जा' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची, पश्चिमेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहून आणि सलामी देऊन सुरवात झालेली नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक आयोजित भाजपची तर सुभाष रोड येथे काँग्रेसची अशा दहीहंडी उत्सवाने दिवसभर डोंबिवली परिसरात ढाक्कुमाकुमच्या तालावर हळूहळू थरावर थर रचून सलामी देण्यासाठी दिवा, कल्याण, उल्हासनगर, ग्रामीण भागासह डोंबिवलीतील मंडंळांमध्ये चढाओढ दिसत होती. 

डोंबिवली परिसरात सुमारे तीस सार्वजनिक मंडळांतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वै. ह. भ. प. बाळकृष्ण पाटील प्रतिष्ठान तर्फे आजदे गावात हंडीचे आयोजन करुन पथकांना तब्बल 2, 22, 222 रुपयांची बक्षिसे देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष वासुदेव पाटील यांनी दिली. महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेतर्फेपाटकर पथ येथे कष्टकरी कामगारांतर्फे मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे जे. पी. ग्रुप तर्फे आजदे गावात दहीहंडीला मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आपल्या टिशर्टवर 'बेटी बचाव'चा अर्थपूर्ण संदेश देणाऱ्या आशिर्वाद मंडळ टेलकोस वाडी यांनी दिलेल्या सात थरांच्या सलामीत प्रियांका कदम या गोविंदाने सातव्या थरावर तोल सांभाळून 'बेटी बचाव'चा नारा दिला. कोपरगाव येथे शिवसेनेतर्फे आयोजित दहिहंडीत रोख बक्षिसे व आकर्षक चषक यशस्वी मंडळांना देण्यात आले. राजाजी पथ येथे साईलिला मंडळातर्फे क्रेन वर बांधलेल्या हंडी बरोबरच करण्यात आलेली रोषणाई लक्षवेधक ठरली. 

आपल्या उज्वल भविष्यासाठी अधिकाधिक सायकलचा वापर करुन 'प्रदूषण टाळा व पर्यावरण वाचवा' हा संदेश देण्यासाठी नागरिकांसाठी लकी ड्रॉ द्वारे अनेक बक्षिसांबरोबर देण्यात आलेल्या सायकलींचे बक्षिस हे वेगळे आकर्षण ठरले तर भाजपने पाणी, वीज, इंधन, पैसा व वेळेची बचत करण्याचे डोंबिवलीकर नागरिकांना आवाहन केले. यासाठी शहरभर उभारण्यात आलेल्या कमानी व एकूणच भव्यदिव्य सोहळा साजरा करणाऱ्या भाजपावर सोशल मिडीयावर मात्र सातत्याने टिका होताना दिसत होती. एकूणच समोर उभ्या ठाकलेल्या निवडणुक प्रचाराचा ट्रेलर म्हणून सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी यंदाच्या दहीहंडीचा पुरेपुर फायदा घेतला अशी चर्चा डोंबिवलीकर करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT