मुंबई

दहिसरमध्ये स्वच्छतेची दिवाळी, घोसाळकर कुटुंबियांचा उपक्रम

कृष्ण जोशी

मुंबई: कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्वच्छतेचे महत्व नागरिकांना कळावे म्हणून दहिसरला घोसाळकर कुटुंबियांनी स्वच्छता मोहीम तसेच कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. 

शिवसेना उपनेते आणि म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी प्रभाग क्रमांक एक मधील आयसी कॉलनी परिसरातून स्वतः रस्त्यावर उतरून झाडू हातात घेऊन ही मोहीम सुरु केली. या मोहिमेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आनंद वागराळकर, आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक अभियंता नितीन विंदे आणि अन्य अधिकारी, शिवसेना शाखाप्रमुख राजू इंदुलकर, महिला संघटक ज्यूडी मेंडोसा, युवा सेनेचे जितेंन परमार तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग होता.

कोरोनाची पहिली लाट जवळपास संपुष्टात येत आहे. मात्र त्याचवेळी दुसऱ्या लाटेची भीती आहेच. वैयक्तिक तसेच सामाजिक स्वच्छता पाळूनच कोरोनाला पराभूत करता येईल, हे पटवून देण्यासाठी ही मोहीम असल्याचे विनोद घोसाळकर यांनी यानिमित्ताने सकाळला सांगितले. दिवाळीत आपण आपले घर स्वच्छ करतो, मात्र त्याचबरोबर परिसर स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. सामाजिक स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या दोनही गोष्टी पाळल्या तरच आपण कोरोनाची दुसरी लाट थोपवू शकतो. दोघांपैकी एकजरी गोष्ट केली नाही, तर आपले उद्दिष्ट साध्य होणार नाही. वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छतेबाबत आपण सर्वचजण जागरुक असतोच. पण तितकीच दक्षता सार्वजनिक स्वच्छतेबाबत घेतली जात नाही, त्यामुळे सामाजिक स्वच्छतेवर भर देण्यासाठी ही मोहीम आहे, असे अभिषेक घोसाळकर म्हणाले. 

त्यासाठी या मोहिमेत प्रत्यक्ष स्वच्छतेबरोबरच जनजागृतीही केली जात आहे. कोरोनाला पराभूत करण्यासाठी स्वच्छतेचे महत्व तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात घ्यावयाची काळजी याबाबतही घोसाळकर कुटुंबीय तसेच पालिकेचे अधिकारी लोकांना माहिती देत आहेत. दहीसरमधील उच्चभ्रूंच्या वस्त्या, मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायट्या, चाळी, झोपडपट्ट्या अशा सर्व ठिकाणी ही मोहीम सुरु आहे. त्यामुळे दहिसरचा परिसर चकाचक झाल्याचे चित्र आहे. दिवाळीत तसेच त्यानंतरही मोहीम सुरुच राहील, असेही अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dahisar Ghosalkar family celebrated Diwali unique way hygiene campaign public awareness

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT