dahisar bank 
मुंबई

दहिसर SBI बँक दरोडा: बुटामुळे दरोडेखोर अटकेत, श्वानानं काढला माग

दहिसरच्या एसबीआय (dahisar sbi bank) बँकेत दुपारी दरोडा घालणाऱ्या दोन्ही दरोडेखोरांना 7 तासात पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - दहिसरच्या एसबीआय (dahisar sbi bank) बँकेत दुपारी दरोडा घालणाऱ्या दोन्ही दरोडेखोरांना 7 तासात पोलिसांनी अटक केली आहे. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव अशी दोघांची नावं असल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे. दहिसरच्या एसबीआय बँकेच्या शाखेत दरोडा टाकुन अडीच लाखाची लुट करण्यात आली होती, तर दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत़्यु झाला होता.

पोलिसांना दरोडेखोरांचा एक बुट मिळाला होता, त्याच्या वासानं मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातल्या (dog squad) एका श्वानानं पोलिसांना एका आरोपीपर्यंत पोहोचवले. त्या घरात पोलिसांना एक दरोडेखोर सापडला, त्यानंतर तिथंच काही अंतरावर असलेल्या घरात दुसरा दरोडेखोरही पोलिसांना सापडला. दोघंही भाऊ असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे.

चोरट्यांच्या गोळीबारात झाला होता एकाचा मृत्यू

दहिसरच्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन दरोडेखोर घुसले होते. बंदुकीचा धाक दाखवत बँकेत प्रवेश करणाऱ्या दरोडेखोरांना संदेश गोमारे (२५) या कर्मचाऱ्याने अडवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान दरोडेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यात संदेशचा मृत्यू झाला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ पथक नेमली होती. यात सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT