मनोर ः वन परिक्षेत्रातील वन विभागाच्या जागेवर सुरू असलेले बेकायदा बांधकाम.  
मुंबई

भूमाफियांचा वनजमिनींवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा

मनोर ः वन विभागाच्या मनोर वनपरिक्षेत्र परिसरात वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर कारवाई करण्याऐवजी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालढकल केली जात असून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. याकडे गांभार्याने लक्ष देऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी आहे.

वनविभागाच्या मनोर वन परिक्षेत्राच्या परिसरातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्ग परिसरात हॉटेल व्यवसाय आणि त्यास पूरक व्यवसाय फोफावला आहे. पालघरला जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर मनोर परिसरात नागरीकरणात वाढ झाली आहे. महामार्गाशेजारील खासगी मालकीच्या जमिनींचे दर आवाक्‍याबाहेर गेल्याने भूमाफियांची वक्रदृष्टी वन विभागाच्या मोक्‍याच्या जागांवर वळली आहे.

त्यामुळे महामार्गावरील वनविभागाच्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करूम बांधकामे करण्यात आली आहेत. वर्षभरापूर्वी महामार्गावरील वनविभागाच्या जमिनींवरील अतिक्रमणाबाबत श्रमजीवी संघटनेतर्फे मनोरच्या वनक्षेत्रपालांच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी कारवाईची मागणीही करण्यात आली होती. 

महामार्गाच्या मस्तान नाक्‍यावरील कुमार पार्क हॉटेलच्या मागील बाजूस वनविभागाच्या गट क्रमांक २४६/३४ मधून वनहक्क दाव्यांतर्गत वाटलेल्या वनपट्टा क्रमांक ४० मध्ये भूमाफियांतर्फे वनविभागाच्या जागेवर सिमेंट काँक्रीटचे कुंपण, प्रवेशद्वार आणि सुरक्षा रक्षक केबिनचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच इमारत बांधकामाच्या साहित्याची साठवणूक करण्यात आली आहे. भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम उभे राहण्याची भीती पर्यावरणप्रेमींसह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कुमार पार्क हॉटेलच्या मागील बाजूस वनविभागाच्या जागेवर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याशिवाय लवकरच ते तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. 
तुषार काळभोर, वनक्षेत्रपाल, मनोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT