मुंबई

ट्रकच्या धडकेने रे रोडच्या पुलाला धोका 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवर असणाऱ्या पुलाच्या खांबाला बुधवारी (ता.11) ट्रकने धडक दिल्याने या पुलाचा खांब उखडला आहे. त्यामुळे पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे. या दुघर्टनेनंतर तत्काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल बंद करण्यात आल्यामुळे त्यावरून जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळण्यात आल्याने या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

या पुलाच्या पाहणीसाठी महापालिकेने तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिटरची नेमणूक केली असून लवकरच या पुलाचा अहवाल मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे. या अहवालात जर पुलाचे काम करणे आवश्‍यक असल्यास तातडीने कामाला सुरुवात केली जाईल; परंतु तोपर्यंत हा पूल बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येलाच ही दुघर्टना घडल्यामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. 

रे रोड येथील रेल्वेपुलाखालून जाणाऱ्या एका भरघाव ट्रकने दुपारी 1 वाजता धडक दिली. या धडकेमुळे पुलाचा लोखंडी खांब वाकून उखडला गेला. त्यामुळे या पुलालाच धोका निर्माण झाल्याने तत्काळ या रस्त्यांवरील; तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यासाठीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

परंतु या पुलावरील अनधिकृत झोपड्यांमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडत होते. मात्र आता या अपघातामुळे या पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याचे काम स्ट्रक्‍चरल ऑडिटच्या अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार याची दुरुस्ती करण्यात येणार होती; परंतु या अपघातानंतर तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिटरची नेमणूक करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case Verdict : नसरापूर हत्याप्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेप? आज न्यायालयाचा अंतिम निकाल

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गोड बातमी! सोन्याचे भाव पुन्हा घसरले; आज 10 ग्रॅमचा भाव किती?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल

Maharashtra TET Exam Cancelled : 'टीईटी'चे गोपनीय साहित्य ट्रकमधून पुण्याला पाठविले; उत्तरपत्रिका-स्वाक्षरी पटाचा समावेश, प्रश्नपत्रिका जिल्हा कस्टडीत सुरक्षित

Ram Shinde : विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार : राम शिंदे

SCROLL FOR NEXT