Gold Silver Rate Sakal
मुंबई

Gold Rate: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने महागले, मार्चपर्यंत ४० लाख विवाह.. असा होणार सोनेदरावर परिणाम

CD

प्रभादेवी, ता. २४ (बातमीदार) : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बरेच जण सोने खरेदी करतात. या मुहूर्तावर आज सोने महागले; मात्र ज्वेलर्समध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

विजया दशमीला सोन्याला वाढता भाव हा एक पारंपारिक ट्रेंड आहे. याचे कारण असे की या सणाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,००० आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ५९,००० होती.

विजया दशमीला सोने खरेदी करणे शुभ मानली जाते. या दिवशी हिंदू लोक लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. सोने हे समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक मानले जाते. म्हणून ते विजया दशमीला खरेदी करणे शुभ मानले जाते. सोन्याचा भाव वाढल्यामुळे खरेदी करण्यासाठी ग्राहकाचा तुलनेने कमी प्रतिसाद असल्याचे पद्मावती ज्वेलर्सचे जितेंद्र जैन यांनी सांगितले. स्वप्नील मुंज या ग्राहकाने ‘दसऱ्याच्या मुहूर्तावर आम्ही थोडे तरी सोने खरेदी करतो. सोन्याचा दर हा वाढत असतो. त्यामुळे ती एक चांगली गुंतवणूक ठरते,’ असे सांगितले.

भाव वाढण्याची शक्यता
मुंबई ः जागतिक अस्थिर आणि देशांतर्गत चांगल्या परिस्थितीमुळे सध्या लोक गंभीरपणे सोने खरेदी करत असून मोठे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी सोन्याच्या भावात आतापेक्षा २० टक्के वाढ होण्याची शक्यता, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सकाळ कडे व्यक्त केली.


कोरोना नंतरच्या काळात छोटे दागिने खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता. नंतर घेऊ, सध्या खरेदी नको, असे म्हणत गेली दोन वर्षे लोक चाचपडत होते. मात्र आता सरासरी किमान दहा तोळ्यांच्या पुढचे दागिने घेण्याचा लोकांचा कल सुरू झाला आहे. मोठ्या बांगड्या, मोठे दागिने, मंगळसूत्र आदी खरेदी सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.

मार्चपर्यंत ४० लाख विवाह
विविध संस्थांच्या अहवालानुसार देशात मार्चपर्यंत ३५ ते ४० लाख विवाह होतील. त्याचीही दागिने खरेदी लोकांनी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे जागतिक अस्थिर परिस्थितीमुळे वित्तसंस्था, मध्यवर्ती बँका अगदी चीन, रशिया हे देश देखील सोने खरेदी करत असल्यामुळे भाव वाढत आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत हाच कल राहील, असे दिसते. त्यातही देशाचा विकास होत असल्यामुळे लोकांकडे पैसा असल्यामुळे ते खर्च करीत आहेत.

आज दसऱ्याच्या दिवशीही लोकांनी २५ टक्के सोने वळी, बिस्कीट स्वरूपात व ७५ टक्के दागिने खरेदी केले. त्यातही मोठे दागिनेच जास्त खरेदी करण्यात आले. अनेकांनी आधीच बुकिंग करून मुहूर्तावर दागिने नेले. टेम्पल ज्वेलरी, कलकत्ता, कुंदन आदी दागिने लोकांनी घेतले. पुढचे दिवस भारतासाठी चांगले असल्यामुळे लोक आता गंभीरपणे सोने घेत असल्याचेही सौरभ गाडगीळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT