dasara melava BJP devendra fadanvis on dasara melava at shivaji park high court decision 
मुंबई

Dasara Melava : सेनेला परवानगी मिळाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाही, खरी शिवसेना कोणाची हा वाद अजूनही मिटलेला नसताना मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे. मुंबई हायकोर्टाने आज हा निर्णय दिल्यानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झाले. यानंतर भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे प्रशासन करेल, यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. कोर्टामध्ये पोलिसांनी आणि महानगरपालिकेने त्यांची भूमिका मांडली होती, त्यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. त्यावर कोर्टाने दिलेला निर्णय पाळवा लागतो आणि तो पाळला जाईल असे फडणवीस म्हणाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पाळली गेली पाहिजे याकरिता पूर्ण काळजी आम्ही घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीसांचे दोनच शब्दत उत्तर..

उच्च न्यायालयातील शिवतीर्थाच्या लढाईत शिवसेनेला विजय मिळाला आहे, यानंतर शिवसेनेकडून आता न्यायालयीन लढाई जिंकली तशी येणाऱ्या अनेक लढाया आम्ही जिंकत राहू अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान याबद्दल विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी 'शुभेच्छा आहेत' या दोनच शब्दत उत्तर दिलं.

कोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली ज्यामध्ये त्यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं की, "दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका". उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो गेल्या ६६ सालापासून त्यासंबंधीच्या केसमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. मी म्हणतो न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरलेला आहे.

आता न्यायदेवतेनं आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे. त्याबद्दल मी तमाम शिवसैनिकांनी शिवसेनाप्रेमींना आणि माता-भगिनींना आवाहन करतो की, उत्साहात या...वाजत गाजत या...गुलाल उधळत या. पण शिस्तीनं या कुठेही आपल्या या तेजस्वी परंपरेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st Test: रचिन रवींद्रला DRS अभावी जीवदान, पण अखेर OUT! डॅरिल मिचेलचाही जैस्वालने घेतला भारी कॅच; लंचपर्यंत भारताचं वर्चस्व

MS Dhoni Retirement: "मी गांगुलीला तेव्हाच सांगितलेलं..." सचिन तेंडुलकरने धोनीबद्दलचा सांगितला जुना किस्सा; खास पोस्ट चर्चेत

Maharashtra Wage Rules: सुट्टीच्या दिवशी काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे? महाराष्ट्रातील नव्या वेतन नियमांत काय?

IND vs NZ, 1st Test: बुम बुम बुमराह! तिसऱ्याच बॉलवर न्यूझीलंडच्या कर्णधाराला केलं क्लिन बोल्ड, दोन्ही ओपनर बाद; Video

Motherhood and Career: आई झाल्यानंतर पुन्हा ऑफिसला जाताय? कामावर परतताना महिलांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT