eknath shinde and uddhav thackeray sakal
मुंबई

Dasra Melava: दसरा मेळावा गाजवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे सज्ज ; वाचा नक्की कशी सुरु आहे जय्यत तयारी!

सकाळ डिजिटल टीम

Dasra Melava : शिवसेनेच्या वार्षिक कार्यक्रमात सर्वाधिक महत्त्वाचे स्थान असलेल्या दसरा मेळाव्याची दोन्ही गटांनी भव्य तयारी सुरू केली असून संख्याबळ कुणाचे, याची जोरदार स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी मुंबईतील माजी नगरसेवक ओढण्याची स्पर्धा सुरू ठेवली असतानाच मेळाव्यासाठी गर्दीचा उच्चांक कसा स्थापन करता येईल याबद्दलही जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईलगतच्या गावांमधून आणि शहरातून कार्यकर्ते मेळाव्याला यावेत याची तयारीही करण्यात येत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्कची हक्काची जागा मिळाल्याने त्यांच्यात आनंद आहे.

महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी मुंबई आमचीच, असे सांगण्यासाठी दसरा मेळाव्याचा वापर केला जाईल. कंत्राटी भरती आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी पक्षाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण शिवसैनिकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. मेळाव्यासाठी शाखाशाखांतून सैनिक येणार असून एकनाथ शिंदेंसमवेत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघातून नागरिक यावेत यावर भर दिला जाणार आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचेही या वर्षी मेळाव्यात भाषण होईल.

श्रीकांत शिंदे सक्रिय

शिंदे गटाने गेल्या वेळी वांद्रे-कुर्ला मैदानात मेळावा आयोजित केला होता. त्याऐवजी यंदा आझाद मैदानात मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. येण्या-जाण्याची सोय होईल, अशी पुस्तीही जोडली जात आहे. गेल्या वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सक्रिय झाले असून त्यांचे या वर्षी मेळाव्यात भाषण होते काय, याबद्दल उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT