Ramdas Kadam sakal media
मुंबई

रामदास कदमांच्या गैरहजेरीतही विरोधी घोषणाबाजी

मृणालीनी नानिवडेकर

मुंबई : रामदास कदम मुर्दाबाद ,रामदास कदम (Ramdas Kadam) गद्दार आहेत अशा घोषणा आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात (Dassehra Melava) देण्यात आल्या. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्या भाषणापूर्वी आज कदम यांच्या निषेधाच्या घोषणा सुरु झाल्या. कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांच्या विरोधातील कागदपत्रे भाजपनेते किरीट सोमैयांपर्यंत (kirit somaiya) पोहोचवल्याचा आरोप आहे. या संदर्भात आपली अकारण बदनामी होते आहे. अनिल परब माझ्या सख्ख्या भावाला बरोबर घेवून माझ्या विरोधात कुभांड रचत असल्याची व्यथा मांडणारे पत्र कदम यांनी नुकतेच मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवले आहे.तरीही मी पक्षाला महत्व देत शांत असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दसरा मेळाव्यात रामदास कदम यांच्यावर सैनिक खवळतील याची कल्पना अगोदरच आल्याने त्यांनी आज येवू नये यासाठी सेनेच्या वरिष्ठ वर्तुळातूनच निरोप देण्यात आले होते. रोषाचे रुपांतर अप्रिय प्रसंगात झाले तर मेळाव्याचा बेरंग होईल असे सांगत सभागृहात येवू नये ही विनंती करण्यात आली असे कदम यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शिवसेनेवरील माझी निष्ठा अभंग आहे.तेथे मी का यायचे नाही असा सवाल करीत प्रारंभी ही विनंती कदमांनी धुडकावून लावली.पण शिवसेनेतील अंतर्गत वादाचीच चर्चा झाली तर मेळाव्यातून जो संदेश द्यायचा आहे तो जाणार नाही. भाजपच्या हाती कोलित मिळेल असे सांगत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे ,सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी कदम यांना मेळाव्यात येणे इष्ट नसल्याचे सांगितले.आज दिवसभर सेनेत या प्रकाराची चर्चा सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात SIR ला मुदतवाढ, आता १७ ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी, 'या' तारखेला प्रसिद्ध होणार प्रारुप मतदारयादी

'Ajinkya Rahane ने बुडणारं जहाज वाचवलेलं, पण त्याला श्रेय मिळालं नाही...', गावसकरांचा भारतीय क्रिकेटवर निशाणा

Jayakwadi Dam Water Release: जायकवाडी नाथसागर धरणातून गोदावरीत १० हजार क्युसेक विसर्ग; नदीपात्रातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

MS Dhoni: रेसिंग ट्रॅकवर 'माही'चा जलवा! मद्रास सर्कीटवर धोनीने पळवली सुपरबाईक, Video तुफान Viral

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये येणार ‘पिंक प्लॅटफॉर्म’! महिला प्रवाशांसाठी मोठा निर्णय; कसा असणार उपक्रम?

SCROLL FOR NEXT