मुंबई

वडिलांनी रागवल्यामुळे 16 वर्षाच्या मुलीने सोडलं घर! दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे पालकांच्या डोळ्यात पाणी

प्रमोद जाधव

अलिबाग : तालुक्‍यातील कनकेश्वर फाटा येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. अलिबाग पोलिस ठाण्यातील दामिनी पथक आणि अंमलदारांच्या सतर्कतेमुळे ती अवघ्या काही तासांत सापडली. तिला आईकडे सुखरूप देण्यात आले. त्यामुळे आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. 

कनकेश्वर फाटा येथील एका महिलेने मंगळवारी दुपारी त्यांची 16 वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात नाईक रूपेश निगडे यांच्याकडे केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून निगडे यांनी पोलिस निरीक्षक कोल्हे यांच्या मार्गदर्शनानुसार दामिनी पथकातील सोनम कांबळे, हवालदार राकेश काळे आणि वाहनचालक उदय सावंत हे बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रवाना झाले. याचदरम्यान गुंजीस फाटा येथील तळ्याजवळ वर्णनानुसार एक मुलगी उभी असल्याचे पथकाला दिसून आले.

दामिनी पथकातील कांबळे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तिचे वडील तिच्यावर रागावल्याने सकाळपासून ती घरातून बाहेर निघून गेल्याचे सांगितले. त्या मुलीचे मन परिवर्तन करून पोलिसांनी तिची आई व मामा यांच्या ताब्यात तिला सुखरूप परत केले. 
Daughter left home due to fathers angry damini group found her in

----------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : नितेश राणे मुंब्रामध्ये दाखल

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT