Bull race sakal media
मुंबई

कर्जत : बैलगाडी शर्यतीत दौलत देशमुख यांचा मृत्यू; आयोजकांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत (ukrul grampanchayat) हद्दीतील माळरानावर काही ग्रामस्थांनी बेकायदा बैलगाडी शर्यतीचे (illegal bull race) आयोजन केले होते. शर्यत पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला शर्यतीतील बैलाचे शिंग लागून ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचा (one person death) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात आयोजकांवर गुन्हा दाखल (police fir filed) करण्यात आला.

तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत परिसरात शुक्रवारी (ता. १८) बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे शंभर बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. बऱ्याच कालावधीनंतर बैलगाडी शर्यत पाहायला मिळणार असल्याने आजूबाजूच्या गावांमधून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. शुक्रवारी दुपारच्या सुमारास स्पर्धेच्या आरंभ रेषेपासून बैलगाड्या सुटल्यानंतर एक बैलगाडी प्रेक्षकांच्या जवळून गेली.

त्यावेळी दौलत देशमुख (वय ६६, रा. चोचीची वाडी, कर्जत) यांना बैलाचे शिंग लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना पनवेल येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला. स्पर्धेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसणे, तसेच कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT