Riyaz Bhati Sakal
मुंबई

दाऊदचा हस्तक रियाझ भाटीला मुंबई क्राईम ब्रांचने केले अटक

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 26 सप्टेंबर रोजी रात्री अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 26 सप्टेंबर रोजी रात्री अटक केली.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा समजला जाणारा रियाझ भाटीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 26 सप्टेंबर रोजी रात्री अटक केली आहे. रियाझ भाटी आणि छोटा शकील यांचा नातेवाईक सलीम फ्रूट यांनं अंधेरीतील एका व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन महागडी वाहनं आणि पैसे उकळले होते. याच प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकानं रियाज भाटी याला अंधेरी परिसरातून अटक केली आहे. क्राईम ब्रँचचा हा तपास पुढे नेण्यासाठी आता सलीम फ्रुटच्या कोठडीची गरज असून, त्यासाठी गुन्हे शाखेनं एनआयए कोर्टात अर्ज दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

गँगस्टर छोटा शकीलचा साडू सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ सिराज भाटी यांनी वर्सोवा येथील एका व्यापाऱ्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 30 लाखांची रुपयांची महागडी गाडी आणि 7.50 लाख रुपये रोख रक्कम उकळली होती. डी कंपनीशी संबंध असल्याबद्दल एनआयएनं सलीम फ्रुटला अटक केल्यानंतर वर्सोव्यातील तक्रारदार व्यावसायिकानं खंडणी विरोधी कक्षाशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची लेखी तक्रार दिली. त्यानुसार 26 सप्टेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी आता तुरुंगात असलेल्या सलीम फ्रुटलाही ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहेत. तर रियाझ भाटी विरोधात वर्सोवा पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे रियाझ भाटी?

रियाझ भाटी हा गँगस्टर दाऊद इब्राहिमशी संबंध असलेला गुंड असून त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक आणि गोळीबार अशा अनेक प्रकरणांमधील गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये गोरेगाव येथे नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि निलंबित सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह भाटी यांचेही आरोपी म्हणून नाव होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT