मुंबई

"त्या" दिवशी यंशवंतरावांनी मला बोलावून घेतले; शरद पवारांनी सांगितली आठवण!

सकाळ वृत्तसेवा

 ठाणे : मुंबईत आल्यानंतर मी तरुणांच्या चळवळीत काम करीत होतो. त्या वेळी एका मंचावर माझे भाषण संपल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी मला बोलावून घेतलं आणि विचारपूस केली. त्यांनीच मला मोठं केलं, तेव्हापासून मी मोठा होत गेलो. मला आव्हाड आणि शिंदे यांना या ठिकाणी सांगावेसे वाटते, की नव्या पिढीतील लोकांना घडवण्याची जबाबदारी तुमची आहे. त्यांना संधी द्या; त्यांच्यातील कर्तृत्व ओळखून महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांना सोबत घ्या. तुम्ही नक्कीच महाराष्ट्राला प्रथमस्थानी नेऊन ठेवाल असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. 

आव्हाडांनी आव्हानं स्वीकारली आहेत 

कर्तृत्ववान लोकांना साथ दिली तर समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास वेळ लागत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी हे दाखवून दिले आहे. आज कळव्यात दिसणारे विस्तीर्ण रस्ते, येथील विकासकामे ही त्याची पावती आहे. आव्हाने स्वीकारली तर लोक कधीच विसरत नाहीत. आव्हाडांनी आव्हानं स्वीकारली आहेत. लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकते. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या; तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल; महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी मोठे योगदान देईल, अशी मला खात्री आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे कौतुक केले. 


ठाणे फेस्टिव्हल सोहळ्यात कळवा, विटावा, पारसिक नगर, खारीगाव येथील नागरिकांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आवर्जून उपस्थित राहून त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांची पत्नी ऋता आव्हाड यांचा सत्कार केला. या वेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते. 

स्वतःचं कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले
शरद पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये कोणतीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसलेले आणि स्वतःचं कर्तृत्व असलेले लोक मंत्री झाले. येथे प्रकर्षाने सांगावेसे वाटते, की ठाणेकर भाग्यवान आहेत की त्यांना असे दोन मंत्री मिळाले आहेत, ज्यांच्या कामातून महाराष्ट्र बदलेल. आव्हाड यांच्याकडील गृहनिर्माण आणि एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास या खात्यांमुळे सबंध महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला परवडणारे घर मिळणार आहे याची खात्री आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT