corona dead body e sakal
मुंबई

चेंबूरमध्ये सापडला ताडपत्रीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह

अन्वर कंपाउंड गोडाऊन कम वर्कशॉप परिसरात हा मृतदेह सापडला.

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई: चेंबूर परिसरात प्लास्टीकच्या ताडपत्रीमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे (dead body of women) एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी हत्येचे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. (dead body of women found in chembur area)

चेंबूर येथील अन्वर कंपाउंड गोडाऊन कम वर्कशॉप परिसरात हा मृतदेह सापडला. पुरावा नष्ट करण्यासाठी प्लास्टीकच्या ताडपत्रीमध्ये गुंडाळून जुन्या झालेल्या वापरात नसलेल्या कंटेनरशेडमध्ये हा मृतदेह लपवून ठेवला होता. याप्रकरणी नरेश राठोड(49) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेची ओळख पटलेली नसल्यामुळे सध्या तिची ओळख पटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी परिसरातील पोलिस ठाणी व बेपत्ता नागरीकांबाबतची माहिती घेतली जात आहे. तसेच मृतदेहाचे छायाचित्र सर्व पोलिस ठाण्यांना पाठवण्यात आले आहे. गुन्हे शाखाही याप्रकरणी समांतर तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT