मुंबई

रेल्वेत बसल्याचा सेल्फी पाठवला, पण तो घरी पोहोचलाच नाही

अनिश पाटील, प्रतिनिधी

मुंबई - फोर्ट परिसरातील निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत 23 वर्षीय तरुणाचा सांगाडा सापडल्यामुळे (Death Body) एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे आरोपीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्याचे अपहरण (Kidnapping) करून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी तक्रारीवरून यापूर्वीच आझाद मैदान पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Mumbai Crime Branch) मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली आहे. (death body found in fort mumbai crime branch arrested four people)

डीएन मार्ग येथील केमको इमारतीच्या शेजारी असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या टाकीत रविवारी 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख राजेश चौपाल ऊर्फ मंडल अशी पटली आहे. त्याच निर्माणाधीन इमारतीत काम करणा-या सुरेंदर मंडल याने त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी राजेशचे वडील गौरी महावीर चौपाल ऊर्फ मंडल यांच्या तक्रारीवरून यापूर्वी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार, मृत राजेश हा व्यवसायाने चालक होता. तो कुटुंबासोबत जोगेश्वरी येथे भाड्याने राहत होता. पण कोरोनाच्या दुस-या लाटेत यावर्षी एप्रिल महिन्यात राज्यात लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे तो बिहार राज्यातील मधुबनी येथील मेहनतपूर येथील गावी गेला. एक महिन्यानंतर 12 मेला पवन एक्सप्रेस चे मधुबनी ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई असे तिकीट बुक करून वडीलांना पाठवले होते. तसेच ट्रेनमध्ये बसल्यानंतर सेल्फी काढूनही कुटुंबियांना पाठवला होता. त्यानंतर 13 मेला रात्री त्याला कुटुंबियांनी फोन केला असता तो कल्याणला पोहोचल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे कुटुंबिय त्याची वाट पाहत होते. बराचवेळ झाला तरी राजेश आला नाही, त्यामुळे कुटुंबियांनी त्याला फोन केला असता त्याचा मोबाईल क्रमांक बंद आढळला. दोन दिवस त्याची वाट पाहिल्यानंतर अखेर कुटंबियांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

त्यावेळी पडताळणीत 14 मेला राजेशच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन फोर्ट परिसरातील सोमाणी मार्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आझाद मैदान पोलीसांच्या तपासणीत फोर्ट परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीच्या अंडरग्राऊंड टाकीत मृतदेह सापडला. मृतदेह गळून जावा यासाठी 25 किलो मीठ या टाकीत टाकण्यात आले होते. लोखंडी घनाने मारून या इमारतीत त्याची हत्या करण्यात आली होती.

याच इमारतीमध्ये त्यांच्या गावचा सुरेंदर मंडल (30) काम करतो. त्यानंतर 15 मेला तो अचानक तेथून गावी जातो म्हणून दोन मित्रांसोबत निघून गेला होता. राजेशचे सुरेंदर मंडल याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचा मंडलला संशय होता. त्यावरून यापूर्वी सुरेंदरचा राजेशशी गावी वादही झाला होता. त्यावरून सुरेंदरने राजेशला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यानेच सीएसएमटी येथून राजेशचे अपहरण करून त्याचे काही बरेवाईट केले असल्याची तक्रार राजेशचे वडील गौरी यांनी आझाद मैदान पोलीसांकडे केली होती.त्यानंतर बिहार येथून मंडलसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एकाला कर्नाटक येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलीसांना यश आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT