Death of a student in Poddar Ayurveda College mumbai 
मुंबई

Student Death: पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्याचा मृत्यू; नेमकं काय प्रकरण?

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.

धनश्री ओतारी

Mumbai News : पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हॉस्पिटल प्रशासनाच्या निष्काळजपणामुळे त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. याप्रकरणी जाब विचारत विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल ओपीडी बंद केली आहे. तसेच आंदोलनदेखील केले आहे.(Death of a student in Poddar Ayurveda College mumbai)

वरळी येथील पोद्दार हॉस्पिटल मध्ये BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे वय 22 वर्षे या विद्यार्थ्याला त्याच हॉस्पिटल मधील सेवा अभावी आणि तत्परता दाखवली नसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. रात्री झाडावरून पडुन त्याच्या डोक्यात दुखापत झाली होती.

या प्रकराविरोधात विद्यार्थ्यांच्या मध्ये असंतोष असून डिन यांनी त्या जखमी विद्यार्थ्यांसाठी साधी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही व उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने या विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला आहे. असा आरोप विद्यार्थी करत आहेत.

दयानंद काळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी करत आंदोलन सुरु केले आहे. या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटलची ओपीडी बंद केली आहे. याप्रकरणी कुठलीही कारवाई न करता विद्यार्थ्यांवरच दडपशाही केली जात असल्याने संबंधितांवर कारवाई करावी ही आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मत विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT