death on track kin of passenger thrashed by couple fell on train tracks at Sion mumbai crime news 
मुंबई

Mumbai : स्वप्न अधुरंच..! नुकताच झाला होता पर्मनंट, कारही केली होती बुक पण जोडप्याच्या मारहाणीत रेल्वेपुढे पडला अन्...

रोहित कणसे

महिलेला धक्का लागला म्हणून दाम्पत्याकडून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो तरुण रेल्वे मार्गावर पडला आणि त्याला रेल्वेने उडवलं. या घटनेते जीव गेलेल्या तरुणाचं नाव दिनेश राठोड असं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि सर्वंत्र संताप व्यक्त करण्यात आला. यादरम्यान आता दिनेशच्या कुटुंबियांनी मात्र ही घटना हात बांधून पाहणाऱ्यांबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या घटनेत कोणीही दिनेशचा जीव वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

अवघे २६ वर्षे वय असलेल्या दिनेशचा रेल्वे स्थानकावरील गर्दीत शितल माने या महिलेला धक्का लागला. ल्वेची वाट पाहत असताना १३ ऑगस्ट रोजी रात्री शीव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वर ही घटना घडली. दिनेशचा धक्का लागल्यानंतर शीतल माने या महिलेने दिनेशला तिच्या हातातील छत्रीने मारायला सुरूवात केली. तेवढ्यातच तीचा पती अविनाश माने याने देखील दिनेशला एक ठोसा लगावला. यामुळे दिनेश मागच्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर पडला. तो खाली पडल्यानंतर पुन्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला मागून आलेल्या लोकल गाडीने उडवले. यानंतर शासकीय रुग्णालयात दिनेशचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी काय सांगितलं...

"प्लॅटफॉर्मवरील सहप्रवासी सर्व मूक दर्शक बनले होते. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते की येथे लोक जमले होते पण दिनेशला पकडून प्लॅटफॉर्मवर मागे खेचण्याऐवजी ते फक्त पाहत उभे राहिले." असे मत मृत दिवेशचा चुलत भाऊ सुरेश राठोड यांनी व्यक्त केलं.

शुक्रवारी सुरेश राठोड यांनी काही नातेवाईकांसह दादर जीआरपी चौकीला भेट देऊन दिनेशच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की हे जोडपे दिनेशबाबत इतके हिंसक का झाले होते. त्यांनी मारहाण करण्याऐवजी त्याच्यासोबत काही अडचण असल्यास पोलिसांना फोन करायचा होता," असेही एका नातेवाईकाने सांगितले.

दरम्यान अविनाश आणि शीतल माने या दाम्पत्याला १५ ऑगस्ट रोजी जीआरपीच्या गुन्हे शाखेने अटक केली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.बेस्ट बस कंडक्टर असलेला दिनेश घणसोली येथे लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहत होता. त्यांचे पालक वाशिम जिल्ह्यात राहतात.

"नुकतेच BEST ने त्याला (दिनेश) कायमस्वरूपी कर्मचारी बनवले होते. त्याचे कुटुंब त्याच्या लग्नासाठी मुलगी देखील शोधत होते आणि पुढच्या वर्षी त्याने लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. त्याने एक कार देखील बुक केली होती," असे आणखी एका नातेवाईकाने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

माहीम-माटुंगा पट्ट्यातील एका बस डेपोमध्ये दिनेश काम करत होता. १३ ऑगस्ट रोजी काम आटोपून घरी जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी रात्री ९ च्या सुमारास सायन स्टेशनवर गेला होता. या दाम्पत्याशी झालेल्या भांडणाच्या तासाभरापूर्वी त्याचे भावाशी फोनवरून बोलणे झाले होते. रात्री १० च्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून फोन आला, त्यांनी कळवले की तो ट्रेनने धडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. दिनेशच्या नातेवाईकांनी आता त्याच्या आई-वडील आणि भावंडांसाठी रेल्वेकडून आर्थिक नुकसानभरपाई मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT