Mukesh Ambani 
मुंबई

अंबानींना धमकी देणारा ताब्यात; पोलिसांनी काही तासांतच केलं जेरबंद

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल्स आले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल एकाला दहिसर इथून पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला सोमवारी ८ फोन कॉल्स आले होते, यातून ही धमकी देण्यात आली होती. (Death threat to Mukesh Ambani Suspect detained in Mumbai Dahisar)

रिलायन्स फाउंडेशनच्या रुग्णालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास अनेकदा फोन आला यातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवेमारण्याची धमकी देण्यात आली होती. हा प्रकार गांभीर्यानं घेत पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान, एका संशयीत व्यक्तीला पोलिसांनी दहिसर इथून ताब्यात घेतलं असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारी २०२१ मध्ये अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. यामध्ये स्फोटकं आढळून आली होती. या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन होते. या घटनेनंतर हिरेन यांची हत्या झाल्याचं उघड झालं होतं. याप्रकरानंतर या प्रकरणाचा तपास एनआयएकडं देण्यात आला होता. यानंतर या प्रकरणात सचिन वाझे, सुनील माने आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT