Deccan Queen 95th Birthday Esakal
मुंबई

Deccan Queen 95th Birthday: मुंबई-पुणेकरांच्या लाडक्या 'डेक्‍कन क्‍वीन'चे 95 व्या वर्षात पदार्पण

मुंबई - मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जूनला 95 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1930 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ही पहिली डिलक्‍स गाडी धावली होती.

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबई-पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जूनला 95 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 1930 मध्ये मध्य रेल्वे मार्गावर ही पहिली डिलक्‍स गाडी धावली होती. 

सुरुवातीला सात डब्यांसह दोन रॅकने ही गाडी धावत होती. नंतर डब्यांची संख्या 17 वर पोहचली. त्यातील एक रॅक स्कारलेट मोल्डिंगसह चंदेरी रंगात; तर दुसरा रॅक सुवर्ण रेषांसह निळ्या रंगात रंगवण्यात आला. मूळ रॅकच्या डब्याच्या आतील फ्रेम इंग्लंडमध्ये तयार करण्यात आली आहे, तर गाडीचे डब्बे मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यात तयार झाले.

या गाडीच्या प्रथम श्रेणीतील पाच जुने रॅक बदलून धुळमुक्त 65 प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा करण्यात आली. द्वितीय श्रेणीतील नऊ आसनांऐवजी 120 आसने तयार करण्यात आली. त्यामुळे नव्या रॅकमध्ये 1,417 आसने झाली. तसेच, या गाडीतील भोजनालयात 32 प्रवासी बसू शकतील अशी व्यवस्था आहे. त्यात विविध अत्याधुनिक सुविधाही आहेत. 

अशी आहेत डेक्कन क्वीन ट्रेनची विशेष वैशिष्टे

जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 - द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे.अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे.

डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT