मुंबई

कोविड काळातील नुकसान भरून काढण्यासाठी मद्य अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे

सुमित बागुल

मुंबई : कोविडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री अनुज्ञप्तीना सूट देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच 2020-21 वर्षासाठीची अनुज्ञप्ती शुल्कात केलेली 15 टक्के वाढ मागे घेण्याचा ही निर्णय घेण्यात आला. 

एफएल 3 अनुज्ञप्तीस 50 टक्के, एफएल 4 अनुज्ञप्तीस 50 टक्के, फॉर्म ई अनुज्ञप्तीस 30 टक्के, फॉर्म ई 2 अनुज्ञप्तीस 30 टक्के सूट देण्यात येत आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांनी नुतनीकरण शुल्काचा भरणा यापूर्वी केला आहे अशांना या सवलतीचा लाभ पुढील नुतनीकरणाच्या वेळी मिळेल.

वर्ष 2020 -21  या ताडी वर्षाकरिता करण्यात आलेली 6 टक्के वाढही मागे घेण्यात येईल तसेच 1 सप्टेंबर 2020 ते 31  मार्च 2021 या कालावधीसाठी अनुज्ञप्ती शुल्काच्या प्रमाणात 3 महिन्यांचे अनुज्ञप्ती शुल्क आकारण्यात येईल. ही सूट समायोजनाद्वारे देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष परतावा मिळणार नाही.

वरील सर्व मद्यविक्रीतून शासनाला मोठा महसूल मिळतो. 5 ऑक्टोबर पासून राज्यातील खाद्यगृहे, व परमिट रूम्समधून आसन क्षमतेच्या  50 टक्केच मर्यादेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा  व्यवसाय 50 टक्केच होतो आहे. परमिट रूम्समध्ये त्यांच्याकडील शिल्लक मद्यसाठा संपेपर्यंत सीलबंद विक्री करण्यास 19 मे पासून परवानगी दिली असली तरी ही परवानगी किरकोळ मद्य विक्री दुकानांमध्ये अतिरिक्त गर्दी होऊन नये म्हणून देण्यात आली होती. शिवाय घरपोच मद्य सेवा सुरु असल्याने या कालावधीत त्यांचाही व्यवसाय झालेला नाही. ताडी व्यावसायिकांचे व्यवसाय 5 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण बंद असल्याने 1 सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीतील चार महिन्यांची शुल्क माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क हा राज्याच्या महसुली उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. 2019 - 20 मध्ये 15 हजार 429 कोटी महसूल जमा झाला असून निव्वळ अबकारी अनुज्ञप्ती नुतनीकरण शुल्क 909. 10 कोटी इतके होते.  देशात कोविड प्रादुर्भाव वाढल्याने 25 मार्चपासून देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्व मद्यविक्री दुकाने बंद होती. ती टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली परंतु मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागले. सध्या राज्यात 977 टीडी 1 अनुज्ञप्त्या असून अन्य 28 हजार 435  मुख्य किंवा प्रधान अनुज्ञप्त्या आहेत.

decision of increase liquor licenses fees by 15 percent rolled back by cabinet: 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT