Decision to close boat between Bhaucha dhakka to Revus ferry from Saturday mumbai sakal
मुंबई

Mumbai News : शनिवारपासून भाऊचा धक्का- रेवस फेरी बोटी बंद!

महामंडळाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात नाराजी; प्रवासी -पर्यटकांचे होणार हाल!

सकाळ वृत्तसेवा

- नितीन बिनेकर

मुंबई : गेली ६० वर्षांहून अधिक काळ प्रवासी फेरी बोटीतून शेकडो नोकरदार आणि पर्यटक आपली दुचाकी घेऊन जात येत असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी सागरी महामंडळाने अचानक नोकरदार- पर्यटकांना आपली दुचाकी फेरी बोटीतून घेऊन जाण्यास बंदी घातली आहे.

परिणामी फेरी बोट चालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे आता सागरी महामंडळा एकतर्फी घेतलेल्या निर्णयाविरुद्ध येत्या शनिवारपासून भाऊचा धक्का ते रेवस दरम्यानची फेरी बोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेली अनेक वर्षांपासून भाऊचा धक्का येथुन रेवस, करंजापर्यत फेरी बोटी चालत आहे. भाऊचा धक्का ते रेवस या समुद्र वाहतुकी दरम्यान, दररोज शेकडो नोकरदार आणि पर्यटक ये-जा करतात.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने पर्यटक व नोकरदार वर्गाला , फेरी बोटीतून आपली दुचाकी वाहनाना, घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे पर्यटक व नोकरदार वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली असून, त्यांनी या एकतर्फी निर्णयाचा निषेध नोंदविला आहे.

भाऊचा धक्का ते रेवस आणि रेवस ते भाऊचा धक्का हा जलप्रवास, जलद व प्रदुषण मुक्त आहे. या वाहतुकीच्या दरम्यान, दररोज, पर्यटक हे फेरी बोटीमधून दुचाकी वाहने घेऊन मुंबईकडे आणि अलिबाग कडे जात-येत असतात. गेली 60 वर्षे पर्यटकांच्या सोयीसाठी दुचाकी वाहने फेरी बोटीतून घेऊन जात आहे. परंतु, अचानकपणे सुरक्षेचे कारण देत दुचाकी वाहतुकीला बंद करण्याचा निर्णय, महाराष्ट्र मेरीटाइम बोडाने घेतला आहे.

गैरसोयीसाठी महामंडळ दोषी-

भाऊचा धक्का ते रेवस (अलिबाग) फेरी बोट बंद झाल्यास, अलिबाग येथे जाणारे येणारे पर्यटक आणि नोकरदार वर्ग यांना अतोनात त्रास होणार आहे. याची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड असणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्हाला भाऊचा धक्का ते रेवस (अलिबाग) आणि रेवस ते भाऊचा धक्का ही फेरी बोट सेवा कायमची बंद करावी लागणार असा इशारा मुंबई जलवाहतुक व औद्योगिक सहकारी संस्थेकडून देण्यात आलेला आहे.

तोपर्यंत दुचाकीवर बंदीच-

मुंबईतील भाऊचा धक्का ते रेवस, उरण, मोरा आणि गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावर २०० पेक्षा जास्त फेरी बोटी चालतात. प्रवासी अनेक वर्षांपासून दुचाकी वाहने फेरी बोटीतून घेऊन जात होते. फेरी बोटीतील सुरक्षेच्या उपाययोजनेची माहिती देत नाही तोपर्यंत दुचाकी नेण्यावर बंदी असणार असल्याची माहिती सागरी महामंडळाने दिली.

काय म्हणते सागरी महामंडळ ?

सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सकाळला सागितले की, फेरी बोटीतून दुचाकी वाहन घेऊन जाण्यास आम्ही कायमची बंदी घातलेली नाही. बोटीत वाहन कसे ठेवायचे, त्यांची संख्या किती हवी आणि त्यात पेट्रोल असल्याने सुरक्षेचा दृष्टिकोनातून काय उपाययोजना केल्या त्याबाबत आम्ही मालकांकडून बोटीचा सुरक्षेचा दृष्टिकोनातून आराखडा सादर करण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Matru Suraksha Din 2025: मातृत्व अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकार कोणत्या योजना राबवतंय? जाणून घ्या आजच!

बाबो! भाईजान लग्न करतोय? सलमानच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चेला उधाण, नेटकरी म्हणाले...'दारु पिऊन काहीही...'

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

UAE Golden Visa confusion: 23 लाखांत मिळतोय लाइफटाइम गोल्डन व्हिसा? युएई सरकारने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT