मद्य विक्री 
मुंबई

"लॉकडाऊन'मध्ये हवीशी "अनलॉक'नंतर नकोशी; बियरपाठोपाठ देशी-विदेशी मद्यविक्रीत घट

प्रशांत कांबळे

मुंबई ः लॉकडाऊनच्या तुलनेत अनलॉकिंग काळात मुंबईत देशी-विदेशी मद्याच्या विक्रीमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र आहे. एप्रिल, मे, जून या लॉकडाऊन काळात मद्यविक्रीच्या आकड्यांमध्ये कित्येक पटीने वाढ झाल्याची नोंद आहे; मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर तळीरामांनी मद्य पिण्याकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात मद्य विक्रीत प्रचंड घट झाली आहे. बियरपाठोपाठ देशी, विदेशी मद्याची विक्री घसरल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

लॉकडाऊन काळातही मुंबई उपनगरातील मद्य विक्रीचा महसूल हजार टक्‍क्‍याने वाढला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फक्त 5.64 कोटींची मद्य विक्री झाली होती, तर त्या तुलनेत या वर्षी एप्रिल महिन्यात 63.31 कोटींची मद्य विक्री होऊन तब्बल 1022.98 टक्‍क्‍याने मद्य विक्रीच्या महसुलात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याप्रमाणेच गेल्या वर्षी मे महिन्यात 4.20 कोटी तर या वर्षी 15.74 कोटी, जून 7.9 कोटी तर या वर्षी 11.24 कोटी मद्य विक्रीचा महसुलाची कमाई झाली आहे; मात्र त्यानंतर जुलैपासून मुंबई उपनगरासह राज्यभरात एकूण मद्य प्रकारात प्रचंड घट झाली आहे. कोरोनामुळे चिल्ड बियरसह देशी, विदेशी मद्यांची चव घेणे तळीरामांनी सोडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदा मद्य विक्रीत अशाप्रकारची घट झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

एकूण मद्य विक्रीत घट 
गेल्या वर्षीच्या तुलनेत मुंबई उपनगरात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत बियर विक्रीत 66.16 टक्के घट झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यात 58.25 टक्‍क्‍याने घट, मुंबईत विदेशी मद्य 31.76 टक्के, तर राज्यात 26.67 टक्के घ झाली. देशी मद्य विक्रीवर सर्वाधिक परिणाम मुंबई उपनगरात झाला असून, सर्वाधिक 76.51 टक्के घट तर राज्यात 32.32 टक्के देशी मद्याचा प्याला घसरला. 

मुंबई विभागातील पहिल्या तीन महिन्यांतील वाढ (कोटीत) 
महिने 2019 2020 एकूण टक्केवारी 
एप्रिल 5.64 63.31 1022.98 वाढ 
मे 4.20 15.74 275.16 वाढ 
जून 7.9 11.24 58.48 वाढ 

मद्य विक्रीतून महसूल 
एकूण मुंबई उपनगर 65.56 121.32 85.6 टक्के वाढ 
एकूण राज्य 7421.73 4982.63 32.86 टक्के घट 

मुंबई उपनगरातील बियरची विक्री 
विभाग- 2019 - 2020 - घट टक्केवारी 
मुंबई उपनगर - 269.89 - 91.32 - 66.16 टक्के 
राज्य- 1614.23 - 673.97 - 58.25 टक्के 

मुंबई उपनगरातील विदेशी मद्य विक्री (बल्क लिटर) 
विभाग- 2019 - 2020 - एकूण घट टक्केवारी 
उपनगर- 96.42 / 141.29 / 31.76 
राज्य- 1042.36 / 764.42 / 26.67 

मुंबई उपनगरातील देशी मद्य विक्री (बल्क लिटर) 
विभाग- 2019 - 2020 - एकूण घट टक्केवारी 
उपनगर- 126.97 / 27.29/ 78.51 
राज्य- 1788.65 / 1210.61 / 32.32  

(संपादन- बापू सावंत)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT