नवी मुंबईत निर्बीजीकरणामुळे श्‍वानदंशात घट!
नवी मुंबईत निर्बीजीकरणामुळे श्‍वानदंशात घट! 
मुंबई

नवी मुंबईत निर्बीजीकरणामुळे श्‍वानदंशात घट!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शहरातील भटक्‍या व पिसाळलेल्या श्‍वानांना पकडून निर्बीजीकरण करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे श्‍वानदंशाच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. पशुवैद्यकीय विभागाकडून श्‍वानांचे निर्बीजीकरण केल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा श्‍वानदंशाचे प्रमाण तब्बल निम्म्याने घटले आहे. गेल्या वर्षी १२ हजार २९५ जणांना श्‍वानदंश झाला होता. या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबरपर्यंत ५ हजार ४०४ श्‍वानदंशाच्या तक्रारींची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे.
  
रस्त्यावरील मोकाट श्‍वानांना पकडून त्यांच्यावर तत्काळ उपचार व निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. श्‍वान निर्बीजीकरणावर महापालिकेतर्फे वर्षाला सरासरी एक कोटी रुपये खर्च केला जातो. पशुवैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑक्‍टोबरपर्यंत पशुवैद्यकीय विभागाने ४ हजार २४९ श्‍वानांची धरपकड केली. त्यापैकी एक हजार २७० श्‍वानांचे निर्बीजीकरण व ३ हजार ५६२ श्‍वानांवर किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आले. काही वर्षभरापूर्वी नवी मुंबईत भटक्‍या श्‍वानांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांवर हल्ले झाल्याचे प्रकार समोर येत होते. तसेच काही गावठाणे व झोपडपट्टीमध्ये भटक्‍या श्‍वानांची दहशत निर्माण झाली होती. याची गंभीर दखल घेत पशुवैद्यकीय विभागाने शहरात गेली दोन ते तीन वर्षे श्‍वान निर्बीजीकरण कार्यक्रमात सातत्य राखले गेले. त्यामुळे शहरातील भटक्‍या श्‍वानांमुळे चावा व हल्ले करण्याच्या घटनांचे प्रमाण आता कमी झाले आहे. 

शहरातील नागरिकांच्या मनातून श्‍वानदंशाबाबतची भीती पशुवैद्यकीय विभागाच्या कामगिरीमुळे कमी होत आहे. भटक्‍या श्‍वानांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका जास्तीत जास्त प्रयत्न करत आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका. 

श्‍वानदंशाचे रुग्ण 
2018 - 12 हजार 295 
2017 - 13 हजार 783 
2016 - 14 हजार 546 

पकडलेले श्‍वान 
2018 - 4 हजार 955 
2017 - 7 हजार 387 
2016 - 7 हजार 977 

श्‍वान निर्बीजीकरणावर केलेला खर्च 
2018 - एक कोटी 39 लाख 74 हजार 
2017 - 88 लाख 21 हजार 
2016 - एक कोटी 2 लाख 26 हजार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण कार्तिकचा फिनिशिंग टच अन् बेंगळुरूने साधली विजयाची हॅट्ट्रीक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT