crime sakal
मुंबई

Mumbai Crime : दिल्लीतील फॅशन डिझायनरवर मुंबईत बलात्कार, पीडितेच्या व्यावसायिक मित्राकडून विश्वासघात

पर्यटनासाठी मुंबईत आलेल्या दिल्लीतील फॅशन डिझायनरवर तिच्या व्यावसायिक मित्रानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पर्यटनासाठी मुंबईत आलेल्या दिल्लीतील फॅशन डिझायनरवर तिच्या व्यावसायिक मित्रानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात खार पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

28 वर्षीय दिल्लीतील फॅशन डिझायनर महिला पर्यटनासाठी मुंबईत आली होती. मुंबईत पहिल्यांदाच आल्याने तिने तिच्या व्यावसायिक मित्राच्या घरी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यावर खार येथे राहणाऱ्या तिच्या व्यावसायिक मित्राच्या घरी महिलेने मुक्काम केला.

मात्र त्याच व्यावसायिक मित्राने तिचा विश्वासघात केला. दरम्यान, घटनेनंतर महिलेने तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. परंतु, आरोपी फरार आहे. आरोपीचा शोध घेतला जात असून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT