मुंबई, ता. २३ : निवडणुकीची तुम्ही चिंता करू नका; आपली महाविकास आघाडी सक्षम आहे, असा विश्वास मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना दिला. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे सोमवारी (ता. २३) पहिल्यांदाच शिवसेना भवनात आले. त्यांनी राज्यभरातील जिल्हाप्रमुख आणि शिवसेना नेत्यांची बैठक घेतली.
महत्वाची बातमी गेल्या दहा वर्षांत फक्त दुसऱ्यांदा मुंबईत 'हे' घडलंय
पक्षवाढीकडे लक्ष देताना राज्य सरकार म्हणून शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांवर घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा, असे आदेश उद्धव यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिले. महाराष्ट्रानंतर आता झारखंड हे राज्यही भाजपकडून निसटले आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस बहुमताच्या मार्गावर आहेत. त्या राज्यातील भाजपची सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी ताकद लावली होती.
हे सुद्धा वाचा मुंबईतील 'या' ठिकाणचं रेल्वे क्राॅसिंग ठरतंय धोक्याचं!
सीएए या नवीन कायद्याचा निवडणुकीत फायदा होईल, अशा प्रकारची भाषणे झाली होती; मात्र भाजपला झारखंडमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही, असे ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठाकरे यांचे उत्साहात स्वागत केले.
आगामी निवडणुका आघाडीतर्फेच
महाविकास आघाडीतर्फेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येतील. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आघाडीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या आदेशानेच लढवण्याचे निश्चित झाले आहे, असेही बैठकीत सांगण्यात आल्याचे कळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.