lockdown 
मुंबई

कामगारांसाठी गुडन्यूज ! कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी उद्यापासून 'पास'चे वितरण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लाॅकडाऊनमधून ज्यांना कामकाज करण्‍यासाठी वगळले आहे, त्‍यांना कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी सोमवारपासून (ता. 20) परवानगी पत्र दिली जाणार आहेत. पालिकेच्या विभाग कार्यालयात हे पास दिले जातील. त्‍यासाठी प्रत्‍येक विभागात दोन सहाय्यक विधी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्‍यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

राज्‍य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्‍वे जाहीर केली आहेत. त्‍यानूसार सोमवारपासून काही उद्योग-व्यवसायांना कामकाजास परवानगी दिली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर कामाच्‍या ठिकाणी ये-जा करण्‍यासाठी प्रवासाची परवानगी देण्‍याचे पत्र (पास) वितरित केले जाणार आहेत. पालिकेचे सहाय्यक विधि अधिकारी सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन सत्रांमध्‍ये आपापल्या विभाग कार्यालयांत उपलब्ध असतील. हे अधि‍कारी योग्‍य ती छाननी करुन त्‍यांच्‍या स्‍वाक्षरीने पास वितरित करतील, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.  

नागरिकांचे कामाचे ठिकाण ज्‍या विभागाच्‍या अखत्‍यारित येते, त्‍या विभाग कार्यालयांमार्फत हे परवानगी पत्र दिले जाईल. यासाठी अर्जदाराने साध्‍या कागदावर स्‍वयंघोषित हमी पत्र दिले तरी पुरेसे राहील, असे पालिकने स्पष्ट केले आहे. ज्‍या खासगी रुग्‍णालयांना लॉकडाऊनच्‍या काळात कामकाजास परवागनी दिली आहे, अशा रुग्‍णालयातील कर्मचारी/डॉक्‍टरांना त्‍यांच्‍या रुग्‍णालयातील प्रमुख हेच परवानगी पत्र देतील, असेही पालिका प्रशासनाने स्‍पष्‍ट केले आहे.

Delivery of pass from tomorrow to workers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Explainer : चॅटजीपीटी आणि जेमीनीपेक्षा भारी! आलंय नवे मेड इन इंडिया AI App, कुठून करायचं Download अन् कसं वापरायचं? पाहा

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील MHB कॉलनी परिसर झाला नशेचा अड्डा, भाजप नगरसेवकाची धाड

Atal Pension Scheme : अटल पेन्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही? पाहा नवे नियम

गौतमी पाटील की राधा पाटील! कोणाची किती संपत्ती? एक गाजवून आली बिग बॉस घर, तर दुसरी स्टेजवर करतेय हवा

SCROLL FOR NEXT