कल्याण, ता. २१ (बातमीदार) : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर महाकाय होर्डिंग अन् सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्व होर्डिंगचे महापालिका आयुक्तांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावे, तसेच कल्याणमध्ये अशी दुर्घटना घडल्यास आम्ही संबंधित अधिकाऱ्याला अजिबात माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. घाटकोपरमधील दुर्घटना मानवनिर्मित दुर्घटना आहे. अशी दुर्घटना कल्याणमध्ये घडू नये, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता विभागाने ज्या ठिकाणी भलीमोठी होर्डिंग उभारली आहेत, तिथे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करावी, त्यांची तपासणी करावी, तसेच होर्डिंग अधिकृत आहेत की नाहीत याचाही तपास करावा, तसेच महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचनाही भोईर यांनी केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.