खोडाळा ः उपोषणास बसलेले पाणलोट सचिव. 
मुंबई

मानधनासाठी पाणलोट सचिवांचे मोखाड्यात उपोषण

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा ः मोखाडा तालुक्‍यातील १३ पाणलोट सचिवांचे २०१६ मध्ये केलेल्या कामाचे मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी सोमवारपासून (ता.२३) खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

मोखाडा तालुक्‍यात १३ गावांमधून पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे; परंतु येथे कार्यरत असलेल्या सचिवांना मानधन अदा करण्याबाबत अतिविलंब झाल्याने सचिवांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.

या संदर्भात जूनमध्येही उपोषण करण्यात आले होते; परंतु त्या वेळी कृषी अधिकाऱ्यांनी पद्धतशीर बोळवण केली. १५ दिवसांत कार्यवाहीचे आश्‍वासन देऊनही काहीच अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले असल्याचे उपोषणकर्त्यानी सांगितले.  

दरम्यान, उपोषणाच्या ठिकाणी कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप लक्ष दिलेले नाही. तसेच उपोषणाला बसलेल्या कोणाही सचिवांच्या आरोग्याची साधी देखभालही करण्यात आली नाही. त्यामुळे उपोषण मोडीत काढण्याची पद्धतशीर खेळी खेळली जात आहे, असा आरोप सचिवांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत तालुका कृषी अधिकारी बालाजी सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता आपण जिल्हा कार्यालयात बैठकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

'मी कर्जाने घर घेतलं असतं आणि मेले असते तर...' उषा नाडकर्णी घराबद्दल बोलताना म्हणाल्या...

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Crime News : प्रेमाचा भयानक शेवट! पत्नीच्या प्रियकराची पतीने केली हत्या; पाचोरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Viral Video: आधी आई-वडील गेले, मग पतीही गेला… माझ्या मुलाची काळजी घ्या... ; आईने व्हिडिओत रडत सांगितलं अन् संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT