Aapali chikista scheme sakal
मुंबई

Mumbai News : महानगरपालुकेची 'आपली चिकित्सा' योजना ही 'टक्केवारी योजना' - भाजप

योजनेचा लाभ सामान्यांना १० रूपयांमध्ये देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विविध आजारांचे निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्या अवघ्या ५० आणि १०० रुपयांत उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिकेच्या ‘आपली चिकित्सा’ योजनेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या योजनेची प्रभावीपणे जाहिरात न करता मर्यादित ठेवण्यात आली आहे.

त्यामुळे "आपली चिकित्सा" नव्हे "आपली टक्केवारी" योजना बंद करून या योजनेचा लाभ सामान्य मुंबईकरांना होऊ द्या अशी मागणी भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच आरोग्याच्या दहा रूपयांमध्ये मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचीही मागणी पत्राद्वारे केली आहे.

मुंबई महानगर पालिकेने 'आपली चिकीत्सा' योजना चालवण्यासाठी काढलेल्या सध्याच्या कंत्राटामध्ये मध्ये दोन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी एक कृष्णा डायग्नोस्टिक्स ही सर्वात कमी दर देणारी कंपनी पात्र ठरली आहे.

दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत आणि सध्याच्या दरांच्या तुलनेत सदर पात्र कंपनीने देऊ केलेले दर ५० टक्के पेक्षा कमी आहेत. सध्या सुरू असलेल्या करारामध्ये कंपन्या महापालिकेकडून एका व्यक्तीच्या चाचणीसाठी २०० रुपये घेतात.

परंतु नवीन पात्र कंपनीने ८६ रुपये दर देऊ केला आहे. त्यापैकी एक कृष्णा डायग्नोस्टिक ही सर्वात कमी दर देणारी कंपनी पात्र ठरली आहे. सध्याच्या दरांच्या तुलनेत या कंपनीने देऊ केलेले दर ५० टक्केपेक्षा कमी आहेत.

या अगोदर महापालिकेने चाचणी न करतासुद्धा किमान चाचणीची दर दिवशीची हमी रक्कम अदा केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या कंपनीला महिन्याला लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. सदर योजनेची कोणतीही प्रभावीपणे जाहीरात केली नाही.

यामुळे 'आपली चिकीत्सा' योजनेची व्याप्ती खुपच मर्यादीत होती व तिचा लाभ कंपनीला आणि भ्रष्ट अधिका-यांना झाला, असा आरोप भाजपने केला आहे. या आधीच्या कंपन्या मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रति व्यक्ती २०० रुपये आकारून पालिकेची लूट करत होत्या, असा आरोप भाजपने केला आहे.

ही योजना पूर्वी गोर गरिबांपेक्षा कंत्राटदार कंपन्यांचा फायदा करून देणा-या ठरल्या आहेत. त्यामुळे 'आपली चिकित्सा' योजना नसून 'आपली टक्केवारी' योजना होती, असा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

विविध साथीच्या आजारांमुळे पालिका रुग्णालयांमध्ये पावसाळ्यात रुग्णांची संख्या दुपटीने वाढते. त्यात सर्वच उपनगरीय रुग्णालयांमध्ये चाचण्या उपलब्ध नाहीत. मुख्य पालिका रुग्णालयांमध्ये चोवीस तास मोफत चाचण्यांची सोय उपलब्ध असल्याने या रुग्णालयांवर भार येतो.

चाचण्या वेळेत होत नसल्याने अनेक रुग्ण नाईलाजाने महागडय़ा खासगी प्रयोगशाळांची वाट धरतात. काही ठिकाणी तर रुग्णालयातील डॉक्टरांचे खासगी प्रयोगशाळांशी लागेबांधे असल्याने रुग्णांची लुबाडणूक केली जाते. या पार्श्वभूमीवर रुग्णांना परवडणाऱ्या दरांमध्ये तातडीने चाचणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने ‘आपली चिकित्सा‘ योजना सुरु केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress and Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंसमोर काँग्रेसने निर्माण केला पेच? विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर ठोकला दावा!

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

SCROLL FOR NEXT