मुंबई

देहविक्रीतून सूटका केलेल्या बहिणाचा ताबा मागितला, न्यायालयाने भावालाच ठोठावला मोठा दंड; वाचा काय आहे प्रकरण

सुनिता महामुनकर


मुंबई : देहविक्रीच्या रॅकेटमधून सुटका केलेल्या आणि सध्या सरकारी आश्रय शाळेत निवाऱ्याला असलेल्या बहिणीला सोडवण्यासाठी याचिका करणाऱ्या सख्या भावाला मुंबई उच्च न्यायालयाने तब्बल एक लाख रुपयांचा दंड सुनावला आहे. याचिकादार भावाने बहिणीचा ताबा मिळावा म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे याचिका केली आहे. नागपूर पोलिसांनी बहिणीची सुटका एका देह विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटमधून केली आहे. सध्या तीला सरकारी निवारा शाळेत ठेवण्यात आले आहे. तीचा ताबा भावाला देण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका केली. 

याचिकेवर न्या झेड ए हक आणि न्या अविनाश घारोटे यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगद्वारे नुकतीच सुनावणी झाली.  संबंधित मुलगी सज्ञान आहे. जर तीला सुटका हवी असेल तर तीने स्वतः हून सांगितले असते. तीला जेव्हा निवारा केंद्रात आणले तेव्हाही तीने जाण्याची परवानगी मागितली असती. त्यामुळे तीचा ताबा भावाला देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील के एल धर्माधिकारी यांनी केला. 

या युक्तिवादाला खंडपीठाने मान्यता दिली. सज्ञान बहिणीसाठी भावाने याचिका करण्याची कायद्यामध्ये तरतुद नाही, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच दंडाची एक लाख रुपयांची रक्कम जिल्हा बार असोसिएशनला देण्याचे निर्देशही न्यायालयाने रजिस्ट्री कार्यालयाला दिले. कोविड 19 मुळे समस्येत असलेल्या गरजू वकिलांसाठी याचा वापर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT