Mumbai sakal
मुंबई

राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया जास्त प्रमाणात पसरतोय

राज्यात डेंग्यूच्या 5944 रुग्णांची नोंद झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना (Corona) संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असतांनाच राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया (Chikungunya) संसर्गाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसते. गेल्या केवळ नऊ महिन्यात डेंग्यूचे (dengue) 5944 रुग्ण आढळले असून तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या डेंग्यू आणि चिकनगुनीया संसर्गामुळे राज्यातील साथरोग परिस्थिती चिघळत असल्याचे दिसते. राज्यात डेंग्यूच्या 5944 रुग्णांची नोंद झाली आहे.

तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.नागपूर जिल्ह्यात सहा, तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, अहमदनगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात 3356 रुग्ण होते. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. डेंग्यूसह चिकनगुनिया संसर्ग देखील डोकं वर काढत असल्याचे दिसते. राज्यात चिकनगुनियाचे 1442 रुग्ण आहेत. एकाही रुग्णाचा मृत्यू मात्र झालेला नाही. गेल्या वर्षी फक्त 782 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी देखील या संसर्गाने मृत्यू झाला नव्हता.

मलेरियाचे 9289 रुग्ण

राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढत असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मलेरिया नियंत्रणता असल्याचे दिसते. आतापर्यंत मलेरियाच्या 9289 रुग्ण तर 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी मलेरियाचे 12909 रुग्ण तर 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

डेंग्यूचा प्रभाव असलेले जिल्हे

नागपूर, वर्धा, पुणे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, अमरावती, सोलापूर

  • जलजन्य आजाराचे प्रमाण ही वाढले

कॉलरा,गॅस्ट्रो,अतिसार,कावीळ,विषमज्वर सारखे जलजन्य आजाराचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे वाढले असल्याचे दिसते. जलजन्य आजारांच्या 1217 रुग्णांची नोंद झाली असून गेल्या वर्षी 1174 रुग्णांना बाधा झाली होती. 2018 मध्ये 2289 तर 2019 मध्ये 1510 रुग्णांची नोंद झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Traffic Challan Recovery: थकबाकी असलेला ट्रॅफिक दंड आता वीज बिलातून वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाची सरकारांना महत्त्वाची सूचना

Vastu Tips: धुळीच्या भीतीने घराच्या खिडक्या २४ तास बंद ठेवताय? वास्तूशास्त्रानुसार ओढावू शकतात 'या' ५ मोठ्या अडचणी!

Dharashiv Kirtankar Fight : 'माझी सुपारी का घेतली?'; धाराशिवमध्ये दोन महाराज आपापसात भिडले, थेट हाणामारीनंतर बाल वारकऱ्यांना घेऊन महामार्गावर केलं आंदोलन

IMD Weather Alert : हवामान खात्याचा मोठा इशारा! 28 राज्यांत जोरदार पावसाची शक्यता; ताशी 60 ते 70 किमी वेगाने वाहणार वारे, महाराष्ट्रात स्थिती काय?

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT