Police esakal
मुंबई

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी शुक्रवारी नवी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस उप आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोग व राज्याचे पोलिस महासंचालक यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व निर्देशानुसार पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी शुक्रवारी नवी मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस उप आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

परिमंडळ-1 चे पोलीस उप आयुक्त विवेक पानसरे यांची परिमंडळ-2 च्या उपआयुक्त पदी तर परिमंडळ-2 चे उपआयुक्त पंकज डहाणें यांची परिमंडळ-1 च्या उपआयुक्त पदी बदली केली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांची बदली करण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरीत हजर होऊन कार्यभार स्विकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गत मंगळवारी पोलीस आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस दलातील 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 18 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 20 पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 60 पोलीस अधिकाऱयांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT